शहराचा पारा पुन्हा घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:41 AM2020-12-04T04:41:20+5:302020-12-04T04:41:20+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. लहरी निसर्गामुळे शहराचे हवामान सातत्याने बदलत असल्याचा अनुभव नागरिक घेत ...
शहरात मागील काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. लहरी निसर्गामुळे शहराचे हवामान सातत्याने बदलत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहे. नोव्हेंबर महिना सरला असला तरी नाशिककरांना फारशा कडाक्याच्या थंडीचा सामना आतापर्यंत करावा लागलेला नाही. ११ अंशांपेक्षा खाली किमान तापमाना पारा गेल्याची अजून पेठरोड येथील हवामान निरिक्षण केंद्राकडून नोंद झालेली नाही.
गोंदियासह नागपूरमध्ये पारा चांगलाच घसरल्याने विदर्भात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. यासोबत उत्तर महाराष्ट्रातदेखील थंडीचा प्रभाव आता हळूहळू दिसण्यास सुरुवात झाली आहे. मालेगावमध्ये १४ अंश इतके किमान तापमान गुरुवारी नोंदविले गेले. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी थंडीची तीव्रता नाशकात अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी शहराचे किमान तापमान १६ अंशांवर होते; मात्र गुरुवारी यामध्ये अचानकपणे वेगाने घसरण झाली आणि पारा थेट १३ अंशांपर्यंत खाली आला. यामुळे वातावरणात पुन्हा नागरिकांना पहाटे तसेच सायंकाळी गारठा जाणवला. या घसरणीवरून येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे पुन्हा दिसू लागली आहे.