शहरातील सिग्नल यंत्रणा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:26+5:302021-02-13T04:16:26+5:30
भाजीपाल्याच्या दरात घसरण नाशिक : परजिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात काहीअंशी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये ...
भाजीपाल्याच्या दरात घसरण
नाशिक : परजिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात काहीअंशी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई, गुजराथ येथील मागणीही कमी झाली आहे. त्याचाही दरावर परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांमध्ये समाधान
नाशिक : निर्यात वाढली नसली तरी लाल कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. लाल कांद्याची साठवणूक करता येत नसल्याने शेतकऱ्यांना हा कांदा लगेच विकावा लागत आहे. यावर्षी उत्पादनावरही परिणाम झाला आहे.
बिटको चौकात पायी चालणे कठीण
नाशिक : नाशिकरोडच्या बिटको चौकात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणाहून पायी चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर वाहने उभी केल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दत्तमंदिर रोडवर वाहतूक वाढली
नाशिक : नाशिक रोड परिसरातील दत्तमंदिर रस्त्यावर दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत आहे हा रस्ता अरुंद असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. या मार्गावरून काहीवेळा अवजड वाहनेही ये-जा करतात यामुळे वाहतूक काेंडीही होते. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.