उष्णतेने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 07:28 PM2019-04-28T19:28:31+5:302019-04-28T19:29:44+5:30

देवगांव : उन्हाच्या तडाख्याने गेल्या काही दिवसांपासुन वातावरण तापले असुन तालुक्यात सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत आहे.

Civic Heavy Carnival | उष्णतेने नागरिक हैराण

उष्णतेने नागरिक हैराण

Next
ठळक मुद्देदेवगांव : रस्ते निर्मनुष्य; थंडपेयांना वाढली विशेष मागणी

देवगांव : उन्हाच्या तडाख्याने गेल्या काही दिवसांपासुन वातावरण तापले असुन तालुक्यात सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत आहे.
रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे. दुपारच्या सुमारास नागरीक उन्हाच्या त्रासाने घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार व किरकोळ विक्रेते दुकाने बंद करीत आहेत. काही दिवसांपासून तालुक्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दुपारी कडक ऊन पडते, कडक ऊन्हामुळे लोक दुपारी बारा ते सायंकाळी पाच घराबाहेर येणे टाळत असल्याने रस्ते निर्मनुष्य असतात.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची सुरु वातच तीव्र झाल्यामुळे वृद्ध महिला व आजारी लोकांना उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. घरोघरी दुपारी आणि रात्रीही पंखे व कुलर सुरू असतात. उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी नागरिकांचा कुलर खरेदीकडे कल वाढला आहे. तसेच प्रवाशांकडून बाटली बंद थंड पाण्याबरोबरच आईस्क्र ीम कुल्फी, सरबत, लस्सी, ताक, ऊसाचा रस आदींना मागणी वाढली आहे.
दुपारच्या वेळेत झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी शेतकरी सकाळी लवकरच कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहे. दुपारी कॅनॉल, नदीवर, बंधाऱ्यावरती पोहायला जाणाºया मुलांची संख्या वाढली आहे. एकिकडे ऊन तर दुसरीकडे अधुन-मधुन विजेचे झटके त्यामुळे नागरिकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. त्याचबरोबर पशुधनाचेहि पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहे. एप्रिल महिन्यात तापमान वाढले असुन मे महिन्यात काय अवस्था होईल, यांची चिंता नागरीकांना पडल्याचे दिसुन येत आहे.

Web Title: Civic Heavy Carnival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक