सिव्हिलची अग्निशमन यंत्रणा आउटडेटेड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:51 AM2021-01-10T00:51:25+5:302021-01-10T00:51:46+5:30
नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षामध्ये असलेली अग्निशमन यंत्रणेची (फायर एक्स्टिंग्विशर) मुदत गतवर्षी ३० एप्रिल २०२० या तारखेलाच संपुष्टात आलेली आहे. तर प्रसूती कक्षातील फायर एक्स्टिंग्विशरची मुदतदेखील त्याच दिवशी संपुष्टात आलेली असताना हे आउटडेटेड सिलिंडर त्या कक्षांमध्ये केवळ दिखाव्यासाठी असल्याचे दिसून येत आहे. भंडाऱ्याच्या रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ह्यलोकमतह्णच्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

भंडाऱ्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेत १० बालकांना जीव गमवावा लागला होता. कोणत्याही कारणामुळे लागलेली आग वेळीच लक्षात आली असती आणि तेथील कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करून ती आग रोखली असती, तरी त्या १० निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता. घरी बाळ जन्मल्याच्या आनंदात असलेल्या पालकांवर टाहो फोडण्याची वेळ आली नसती. त्या पार्श्वभूमीवर ह्यलोकमतह्णने शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्ष आणि प्रसूती कक्षातील ह्यफायर एक्स्टिंग्विशरह्णची पाहणी केल्यानंतर धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या दोन्ही कक्षांमध्ये असलेल्या ५ किलो क्षमतेच्या फायर एक्स्टिंग्विशरच्या सिलिंडरची मुदत संपुष्टात येऊन ८ महिन्यांहून अधिक कालावधी उलटलेला असल्याचे दिसून आले. मुळात जिल्हा रुग्णालयासारख्या प्रचंड वर्दळ असलेल्या रुग्णालयात आणि त्यातही अत्यंत संवेदनशील अशा नवजात बालक कक्षातील यंत्रणेची मुदत संपुष्टात येईपर्यंत आणि त्यानंतरही ८ महिने सिव्हिलचे कर्मचारी आणि प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय कसे राहू शकतात? की इतक्या अत्यंत संवेदनशील विभागाकडे काळजीने पाहणारी किंवा मुदतीसारख्या बाबींवर देखरेख ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळामध्ये रुग्णांची अत्यंत चांगली देखभाल करण्यात आली असली तरी अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूंचा जीव देखील गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.