चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 06:56 PM2019-05-31T18:56:41+5:302019-05-31T18:57:58+5:30

सटाणा : शहरातील चौगाव रोड परिसरातील नववसाहतीसह चौगाव बर्डी परिसरातील रहिवाशी कचरा डेपोमुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही गरीब आदिवाशी, मातंग समाजाचे असल्यामुळेच आमच्या दाराशेजारी कचरा डेपो तयार केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला अशा मरणयातना सोसाव्या लागत आहेत. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी ,अस्वच्छता ,गटारींचा अभाव ,गटारी आहेत तर त्याही तुंबलेल्या असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला एकप्रकारे हरताळ फासण्याचे काम दस्तुरखुद्द पालिका प्रशासनाने केल्याच्या संतप्त भावना स्थानिक नागरिकात व्यक्त होत आहेत.

 Civil garbage depot in Chaugaon Birdi area | चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त

चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त

Next

शहरातील चौगाव रस्ता परिसरातील नववसाहती ,चौगाव बर्डी परिसर या भागात शेतकरी ,नोकरदार ,व्यापारी ,कष्टकरी वर्गाचा रहिवास आहे. या भागात गटारींचा अभाव असल्यामुळे ठिकठिकाणी साचलेले सांडपाण्याचे खड्डे ,रस्त्यांची झालेली दुरवस्था ,तीस तीस नळांना पाणी नाही अशा गंभीर समस्यांच्या फेऱ्यात हा परिसर सापडला आहे. या भागातील मुख्य डोकेदुखी आहे ती कचरा डेपो. चौगावबर्डी या मोलमजुरी करणाºया आदिवासी ,मातंग समाजाच्या रहिवाशांच्या वस्तीलगत संपूर्ण गावातील घनकचरा टाकल्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधीयुक्त परिसर म्हणून याकडे बघितले जाते. प्रचंड प्रमाणात दुर्गंधी असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून जातांना नागरिकांना अक्षरश: नाक-तोंड दाबून पुढे जावे लागते .त्यांची ही अवस्था असताना स्थानिक नागरिकांचे काय हाल असतील त्याची कल्पना न केलेलीच बरे. कच-यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असून यामुळे साथीचे आजारही झपाट्याने वाढत आहेत. मलेरिया,डेंग्यू सदृश्य आदी साथींची लागण झालेले सर्वाधिक रु ग्ण याच भागातील असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कचरा डेपोपासून अर्धा किलोमीटर अंतरावर चौगाव रस्त्यावरील नववसाहती आहेत. त्यांनादेखील दुर्गंधीची मोठी समस्या भेडसावत आहे. शहरातील साठफुटी रस्त्याच्या गटारीचीही मोठी समस्या असून याठिकाणी लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांनी अतिक्र मण केल्यामुळे गटार बंद होऊन ती तुंबली आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या या अतिक्र मणमुळे साठफुटी रस्त्याचे काम पंधरा वर्षांपासून रखडले आहे. यामुळे शहराचा पूर्णपणे विकास खुंटला असल्याच्या तक्र ारी आहेत. त्यातच गटार बंद झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अतिक्र मण काढावे अशी मागणीदेखील नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title:  Civil garbage depot in Chaugaon Birdi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.