नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Published: October 16, 2016 10:41 PM2016-10-16T22:41:18+5:302016-10-16T22:53:55+5:30

विंचूर : उकीरड्याजवळील गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा

Civil health risks | नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

 विंचूर : विंचूर गावास पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या येथील लक्ष्मी मार्केटसमोरील व्हॉल्व्हला गळती लागली आहे. उकीरड्याजवळ असलेल्या गळतीमुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर गळती तत्काळ थांबविण्याची मागणी माजी ग्रामपालिका सदस्य महेंद्र पुंड यांनी केली आहे.
गळतीमुळे पाणी रस्त्यावरून वाहत असून, डोंगरगाव रस्त्यालगत पाण्याचे तळे साचले आहे. तळ्याभोवतीच प्लॅस्टिक व कचऱ्यामुळे डासांची निर्मिती होऊन येथे व्यवसायÞ करणाऱ्या व्यावसायिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोळा गाव योजनेचे पाणी याच जलवाहिनीद्वारे लासलगावला जात असल्याने विंचूरसह लासलगावच्या नागरिकांनाही अस्वच्छ पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सोळा गाव समितीकडे हस्तांतरित केलेली सदर योजना पहिल्यापासूनच तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरू पाहत आहे. नांदूरमधमेश्वर धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या या योजनेची पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जलवाहिनीस ठिकठिकाणी गळती असल्याने एका ठिकाणी काम केल्यानंतर तात्पुरती गळती बंद होते अन् काही दिवसात दुसऱ्या ठिकाणी पुन्हा गळती सुरू होत असल्याचा प्रकार योजनेच्या प्रारंभापासूनच सुरू आहे. गेल्या उन्हाळ्यात धरणात पाण्याचा ठणठणाट झाल्याने सदर योजना बंद अवस्थेत होती. मात्र मुसळधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले अन् योजना पुन्हा सुरू झाली. त्यानंतर काही दिवस मात्र मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठा फटका बसला. नळाला खराब पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. काही दिवसांनंतर स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला. महिनाभरापूर्वी गावात विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले. खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. शिवाय डेंग्यूचे रु ग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. मात्र शासकीय दप्तरी केवळ एकच रु ग्ण असल्याचे सांगितले जात असल्याने कागदोपत्री आजाराची तीव्रता कमी दिसली. प्रत्यक्षात नागरिकांनी खासगी दवाखान्यात उपचार घेऊन डेंग्यूसह विविध आजारांचा सामना केला. दूषित हवा आणि पाणी यांमुळे विविध आजारांचे संक्र मण होत असते. त्यामुळे गावास पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या गळतीकडे दुर्लक्ष न करता तातडीने गळती काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Civil health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.