चांदवडला दत्तू भोकनळ, संजीवनी जाधव यांचा नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:44 PM2018-09-14T17:44:05+5:302018-09-14T17:44:32+5:30
चांदवड : तालुक्यातील तळेगावरोहीचे भूमिपुत्र, रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय लष्करातील जवान व रोइंगपटू दत्तू बबन भोकनळने सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तसेच वडाळीभोई येथील आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव यांचा नागरी सत्कार येथील चंद्रभागा लॉन्स येथे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.
चांदवड : तालुक्यातील तळेगावरोहीचे भूमिपुत्र, रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय लष्करातील जवान व रोइंगपटू दत्तू बबन भोकनळने सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तसेच वडाळीभोई येथील आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव यांचा नागरी सत्कार येथील चंद्रभागा लॉन्स येथे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, नाशिक जिल्ह्याचे पोलीसप्रमुख संजय दराडे, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, पंचायत समितीचे सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, नगराध्यक्ष रेखा गवळी, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, संजीवनी जाधवचे कोच विजेंद्रसिंग, उपसभापती अमोल भालेराव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन अहेर, गटविकास अधिकारी हिरामण मानकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकांत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी सांगितले की, ग्रामीण मातीतील खेळाडूंचा सत्कार होणे गरजेचे असून, प्रशासनाच्या वतीने या दोन्ही खेळाडूंना पुढीलभावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याच्या वतीने व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला असल्याचे सांगितले बी.राधाकृष्णन म्हणाले की, दत्तू भोकनळ व संजीवनी जाधव यांनी कठीण परिस्थितीत मात करून आपल्या गावाचे नव्हे तर देशाचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले, त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना अडचणींवर मात करण्यासाठी त्यांचा सत्कार न करता क्रीडाप्रकारात त्यांना भरभरून मदत करण्यासाठी एक समिती तयार करून त्यांना आर्थिक मदत केली जाईल जेणेकरुन पुढील आॅलिम्पिकमध्ये या दोन्ही खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी, आजपर्यंत एवढे मोठे सुवर्णपदक आम्ही बघितले नव्हते, सर्व भावी पिढीला या खेळाडूकडून मार्गदर्शन मिळेल असे कार्य त्यांनी केले असल्याचे सांगितले.