जळगाव निंबायतीत भूमिपुत्रांचा नागरी सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 05:40 PM2020-03-10T17:40:47+5:302020-03-10T17:41:34+5:30
जळगाव निंबायती : ग्रामीण युवकांमध्ये क्षमतांची कमी नाही, त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाला गवसणी घालतील असे प्रतिपादन मालेगावचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी केले.
येथील आम्ही जळगावकर विधायक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा नागरी सन्मान सोहळ्यात प्रमुख प्रांताधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, वाल्मीक कोरे, पोलीस शिपाई वाल्मिक काळे, ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस शिपाई समाधान माळी यांचा व पालकांचा प्रांताधिकारी शर्मा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रोडू अहिरे होते.यावेळी मच्छिंद्र बिडगर, पोलीस शिपाई नितीन आहिरे, सचिन मोरे आदींची भाषणे झाली. यावेळी अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, मल्हार सेनेचे मच्छिंद्र बिडगर, पं. स. माजी उपसभापती बाळासाहेब दुकळे, लक्ष्मण ढोणे, निवृत्त अधिकारी रामचंद्र दुकळे, पाटबंधारे अधिकारी भाऊसाहेब ढोणे, माजी सरपंच सखाहरी दुकळे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, वि. का. सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, पोलीस पाटील लक्ष्मण दुकळे, आम्ही जळगावकर विधायक समितीचे सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरु ण युवकांसह पंचक्र ोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्तविक लक्ष्मण काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी तर आभार प्रा. अतुल पारखे यांनी मानले.