इंदिरानगरमधील वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिक त्रस्त
By admin | Published: March 7, 2017 01:48 AM2017-03-07T01:48:07+5:302017-03-07T01:48:20+5:30
इंदिरानगर : बाहेरगावी गेलेल्या नागरिकांचे फ्लॅट, बंगले हेरून चोरटे भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटून नेत असल्याचे चित्र इंदिरानगरमध्ये आहे़
इंदिरानगर : बाहेरगावी गेलेल्या नागरिकांचे फ्लॅट, बंगले हेरून चोरटे भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटून नेत असल्याचे चित्र इंदिरानगरमध्ये आहे़
घराला कुलूप दिसले की घरफोडी झालीच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे सुख-दु:खाच्या कारणांसाठी कुटुंबीयांसह बाहेरगावी जायचे कसे? घरफोडे इतके निर्ढावले कसे? इंदिरानगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना चोरटे भारी पडू लागल्याने पोलीस नेमके करतात काय, असे प्रश्न रहिवाशांकडून विचारले जात आहेत़
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गत पाच दिवसांत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे़ विशेष म्हणजे परिसरातील एकाही घरफोडीची उकल पोलीस करू न शकल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे़
इंदिरानगर परिसरात गत पाच दिवसांत दोन मोठ्या घरफोड्या करून चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे़ यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गस्तीपथक व गुन्हे शोधपथकाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ (वार्ताहर)