नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटिसा पंधरा दिवसांत डेंग्यूचे ८२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:06 AM2017-12-16T01:06:55+5:302017-12-16T01:08:03+5:30

शहरात गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले ८२ रुग्ण आढळून आले असून, त्याची तीव्रता ओसरत चालल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.

The claim of control: 128 9 Notices to the citizens: 82 cases of dengue in fifteen days | नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटिसा पंधरा दिवसांत डेंग्यूचे ८२ रुग्ण

नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटिसा पंधरा दिवसांत डेंग्यूचे ८२ रुग्ण

Next
ठळक मुद्दे१२८९ नागरिकांना नोटिसा२४८ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण६४४ संशयितांची तपासणी

नाशिक : शहरात गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले ८२ रुग्ण आढळून आले असून, त्याची तीव्रता ओसरत चालल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दरम्यान, महापालिकेने डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन बांधकामांकडे लक्ष केंद्रित केले असून, गेल्या सहा महिन्यांत १२८९ नागरिकांना नोटिसा बजावत समज देण्यात आली आहे.
शहरात स्वाइन फ्लूबरोबरच डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. राज्यात मुंबई-पुण्यानंतर नाशिक हे हिटलिस्टवर होते. आॅक्टोबर महिन्यात ४७८ संशयित रुग्णांचे नमुने तपासले असता २४८ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते, तर नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांची तपासणी होऊन २७६ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निदान झाले होते. मात्र, आता डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दि. १ ते ७ डिसेंबर या कालावधीत १८७ रुग्णांचे रक्तनमुने तपासले असता ४९ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले, तर दि. ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत ९० रुग्णांची तपासणी होऊन ३३ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे आढळून आले. पंधरा दिवसांत ८२ रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने आता पुन्हा डेंग्यूचा फैलाव होऊ नये याकरिता नवीन बांधकामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय, पंक्चर काढणाºया गॅरेजवाल्यांकडेही लक्ष पुरविले जात आहे. महापालिकेने दि. १ जून ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत १२८९ नागरिकांना नोटिसा देऊन समज दिलेली आहे. त्यात टायर-भंगार व्यावसायिक-४६५, नवीन बांधकामे- १५४, शाळा-३१, बेसमेंट- ५९, सेप्टिक टॅँक बंदिस्त करण्यासाठी १७७, तर पाणीसाठ्यांवर झाकण बसविण्यासाठी १०७ जणांचा समावेश आहे.

Web Title: The claim of control: 128 9 Notices to the citizens: 82 cases of dengue in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.