घोटी येथील वनविभागाच्या जागेवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 07:35 PM2020-10-08T19:35:56+5:302020-10-09T01:05:32+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी ही प्रमुख बाजारपेठ असून ग्रामपालिकेच्या वतीने सतत प्रयत्न करून सुद्धा ग्रामपालिकेच्या मालकीची स्वत:ची जागा नसल्याने घन कचºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कंपोस्ट खत प्रकल्प व रोप वाटिका करिता वनविभागाची जागा ग्रामपालिकेला हस्तांतरीत करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे व ग्रामपालिकेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Claim on Forest Department land at Ghoti | घोटी येथील वनविभागाच्या जागेवर दावा

घोटी ग्रामपालिकेला खत प्रकल्प व नर्सरी प्रकल्प उभारणीसाठी वनविभागाची अडीच हेक्टर जागा हस्तांतरित करावी या मागणीचे निवेदन देतांना खासदार हेमंत गोडसे यांच्या समवेत सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, संजय आरोटे आदी.

Next
ठळक मुद्देकंपोस्ट खत प्रकल्प : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी ही प्रमुख बाजारपेठ असून ग्रामपालिकेच्या वतीने सतत प्रयत्न करून सुद्धा ग्रामपालिकेच्या मालकीची स्वत:ची जागा नसल्याने घन कचºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कंपोस्ट खत प्रकल्प व रोप वाटिका करिता वनविभागाची जागा ग्रामपालिकेला हस्तांतरीत करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे व ग्रामपालिकेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
घोटी गाव व परिसरात शेतकरी कुटुंब जास्त असून या परिसरात आदिवासी कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची उपजीविका शेती व जंगलातील वनस्पती उत्पन्नावर अवलंबून आहे. यासाठी शासनाने अंगिकारलेल्या वन धोरणानुसार घोटी परिसरातील जंगलतोड थांबवणे आवश्यक आहे. सदर वन संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जंगल बचाव, झाडे लावा झाडे जगवा हि संकल्पना रु जवण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी घोटी गाव परिसरातील शेतकरी व आदिवासी कुटुंबांना शेतीउपयोगी फळझाडे व इतर झाडांच्या संगोपनासाठी मुबलक जागा उपलब्ध करून द्यावी. खत तसेच झाडे लावण्यासाठी रोपांची लागवड करून ती पुरविण्याचा निर्णय घोटी ग्रामपालिकेने निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपालिकेकडे स्वत:ची मालकीची जागा नसल्याने घोटी येथील महामार्ग क्र मांक ३ च्या लगत ५० हेक्टर पैकी २.५ हेक्टर क्षेत्र कंपोस्ट खत व नर्सरी प्रकल्प उभारण्यासाठी हस्तांतरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच सचीन गोणके, उपसरपंच रामदास भोर, माजी उपसरपंच संजय आरोटे उपस्थित होते.

Web Title: Claim on Forest Department land at Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.