नाशिक जिल्हा बॅँकेच्या वसुलीचे दावे महसूल खात्याकडे पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 03:34 PM2018-03-01T15:34:54+5:302018-03-01T15:34:54+5:30
बॅँकेचा सहकारी कर्ज वसुली हंगाम १ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झालेला असून, मागील ७ ते ८ महिन्यांपासून बँकेस निधीच्या कमतरतेमुळे बºयाच अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत ठेवीदारांना सेवा देणे देखील अडचणीचे झाले आहे पर्यायाने बॅँकेस दररोज रोषास सामोरे जावे लागत आहे.
नाशिक : जिल्हा बॅँकेचे वर्षानुवर्षे कर्ज थकविणा-यांच्या मालमत्तेवर जिल्हा बॅँ केचा बोझा चढविण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून महसुल खात्याकडे दिलेल्या प्रकरणांचा अद्यापही निपटारा न झाल्याने थकबाकीदार निर्धास्त झाले त्यामुळे बॅँकेच्या वसुलीवर परिणाम होत असल्याने जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी जिल्हाधिका-यांना पत्र लिहून थकबाकीदारांच्या मालमत्तेवर बॅँकेचा बोझा चढविण्याकामी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
या संदर्भात बॅँकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बॅँकेचा सहकारी कर्ज वसुली हंगाम १ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू झालेला असून, मागील ७ ते ८ महिन्यांपासून बँकेस निधीच्या कमतरतेमुळे बºयाच अडचणींचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत ठेवीदारांना सेवा देणे देखील अडचणीचे झाले आहे पर्यायाने बॅँकेस दररोज रोषास सामोरे जावे लागत आहे.सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यामाुळे कर्जदारांनी २०१६-१७ या वसुंली हंगामात कर्जफेडीस दाखविलेल्या उदासिनतेमुळे २७९४.९० कोटी वसुली होणे अपेक्षीत असताना फक्त २५२.१० कोटी रूपयेच वसूल होऊ शकले आहेत. बॅँकेची चालू वसुली हंगामात म्हणजेच सन २०१७-१८ मध्ये २७४४.१३ कोटी रूपये वसुल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे पात्र व अपात्र सभासदांची यादी जाहीर झालेली आहे तसेच लाभार्थी शेतकरी सभासदांचे खाती रक्कम भरण्याचे काम बॅँकेने सुरू केले आहे. दिड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या लाभार्थ्यांकडून उर्वरित रक्कम भरल्यास त्यांचेही कर्ज माफ होणार आहे, परंतु त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्यामुळेही बॅँकेची वसुली होत नाही. त्यामुळे बॅँकेने आता वसुली मोहिम हाती घेतली असून, बॅँकेच्या क्षेत्रीय अदिकाºयांच्या बैठकीत कलम १०१ अन्वये केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला असता अनेक तालुक्यात सदर वसुली दाखल्यांचे सन २०१४ पासून कामकाज प्रलंबित आहे. तसेच महाराष्टÑ सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलमांन्वये मोठ्या रकमांचे थकबाकीदार सभासदांकडील जप्त केलेल्या मालमत्तांवर बॅँकेचे नावाचा बोजा चढविण्याचे कामकाजही अनेक ठिकाणी प्रलंबीत आहे. त्यानुसार आपले अधिनस्त असलेले तहसिलदार व तलाठी यांना बॅँकेचे वसुली कामकाजात कलम १०७ अन्वये थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्तेवर बॅँकेचे नावाचे जप्ती बोजे चढविण्याच्या कामकाजासाठी सहकार्य करण्याबाबत सुचित केल्यास बॅँकेस जलद गतीने कर्ज वसुलीचे काम करण्यास मदत होणार आहे.