मिरजकरसह संशयितांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:40 AM2018-08-06T00:40:02+5:302018-08-06T00:40:20+5:30

Clandestine with Mirajkar | मिरजकरसह संशयितांना कोठडी

मिरजकरसह संशयितांना कोठडी

Next
ठळक मुद्देकारवाई : फसवणुकीची रक्कम अकरा कोटी

नाशिक : आर्थिक गुंतवणूक तसेच सोने तारणवर दरमहा जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेले मिरजकर सराफचे संचालक महेश मिरजकर, कीर्ती हर्षल नाईक व अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी या तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी रविवारी (दि़५) एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, आतापर्यंत ४३३ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली असून, मुख्य सूत्रधार व संचालक हर्षल नाईक हा फरार आहे़
जुने नाशिकमधील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सचे संचालक महेश मिरजकर, हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले, श्रेयस आढाव, परिक्षित औरंगाबादकर, सुरेश भास्कर, भारत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व कीर्ती नाईक यांनी गुंतवणूकदारांना दरमहा एक ते दीडपट व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली़ मात्र, गुंतवणुकीवर परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी अ‍ॅड़ केंगे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ तेव्हापासून सराफी पेढीचे संचालक व कर्मचारी फरार झाले होते़
सराफी पेढीतील फरार संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले असून, शनिवारी याबाबत अंतिम निर्णय होणार होता़ यासाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी आलेले महेश मिरजकर, कीर्ती नाईक व प्राजक्ता कुलकर्णी हे शहरात आले असता त्यांचा माग काढून युनिट दोनच्या पथकाने दोन संशयितांना तपोवनातील संत जनार्दन स्वामी मठाजवळून तर एकास इंद्रकुंडावरून ताब्यात घेण्यात आले़ या तिघांनाही रविवारी (दि़५) जिल्हा न्यायालयात हजर केले असता ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या आशुतोष चंद्रात्रे याची पोलीस कोठडीही सोमवारी संपणार असून या चौघांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे़आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४३३ तक्रारदारांनी तक्रारी केल्या असून, फसवणुकीची रक्कम १० कोटी ८८ लाख ९२ हजार ५६२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे़ या तक्रारदाराच्या तक्रारीनुसार १८ किलो सोन्याची नोंद करण्यात आली आहे तर दिवसेंदिवस तक्रारदारांच्या संख्येत वाढ होत चालली आहे़

Web Title: Clandestine with Mirajkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक