आंदोलक-पोलिसांमध्ये नाशिकरोडला झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:57+5:302021-02-06T04:25:57+5:30
यावेळी आंदोलकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, राज्यातील ...
यावेळी आंदोलकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, कोरोनाकाळात वीजबील माफीचे आश्वासन देणारे सरकार सक्तीने वसुली करत जनतेला त्रास देत आहे. कोरोनाकाळात जादा वीजबील भरण्याची क्षमता नाही, शेतकरी, वीजग्राहक संकटात आहेत. त्यामुळे अवाजवी वीजबिल दुरुस्ती करण्याची घोषणा प्रत्यक्षात आणावी, ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनामध्ये भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, हेमंत गायकवाड, नगरसेवक मीरा हांडगे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, पंडित आवारे, बाजीराव भागवत, प्रकाश घुगे, शांताराम घंटे, नितीन कुलकर्णी, किरण पगारे, सचिन हांडगे आदी सहभागी झाले होते.