मालेगावी दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:44 AM2018-11-05T00:44:08+5:302018-11-05T00:44:23+5:30

येथील सटाणा नाका भागातील एकता मंडळासमोर चौकात शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी सोयगाव येथील दोन गटांत हाणामारी झाली. छावणी पोलिसांत शनिवारी रात्री दोन्ही गटांनी परस्परविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Clashes in Malegachi two groups | मालेगावी दोन गटांत हाणामारी

मालेगावी दोन गटांत हाणामारी

Next

मालेगाव : येथील सटाणा नाका भागातील एकता मंडळासमोर चौकात शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी सोयगाव येथील दोन गटांत हाणामारी झाली. छावणी पोलिसांत शनिवारी रात्री दोन्ही गटांनी परस्परविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र दिलीप बच्छाव (२८) रा. सोयगाव, अविनाश चिंतामण पाटील रा. आनंदनगर, सोयगाव यांनी परस्पर गटाविरोधात फिर्याद दिली. जितेंद्र बच्छाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादीची आई वॉर्ड क्रमांक १० ची नगरसेवक जिजाबाई बच्छाव यांनी रवि ऊर्फ टायसन अहिरे यांची सोयगाव वॉर्डातून मालेगाव वॉर्डात बदली केली, याचा राग मनात धरुन रवि उर्फ टायसन यांचे साथीदार अविनाश पाटील व त्याचे तीन साथीदार यांना बरोबर घेऊन जितेंद्र व त्याचा भाऊ भूषण बच्छाव या दोघांना अविनाश पाटील याने बोलावून घेऊन अविनाशच्या साथीदारांनी भूषण यास चॉपरने डोक्यास व कंबरेजवळ मारले. फिर्यादी सोडविण्यासाठी गेला असता अविनाश पाटील याने त्याच्या हातातील गुप्तीने डोक्यावर मारले. गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश चिंतामण पाटील याने भूषण बच्छाव व त्यांच्या साथीदाराविरुद्ध फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री भुषण बच्छाव हा फिर्यादीच्या मालकीच्या हॉटेलवर आला. शिवीगाळ करून तुला हॉटेल चालू देणार नाही, तुला मारून टाकीन असा दम देऊन निघून गेला. नंतर फिर्यादी अविनाश पाटील व त्याचे दोन साथीदार रवींद्र अहिरे व विजय निकम यांच्यासोबत व्हॅगन कारने नवीन बसस्थानकाकडे चहा पिण्यासाठी जात असताना फिर्यादीला भूषण बच्छाव व त्याच्या साथीदारांनी फोनवर सटाणान ाकाजवळ थांबण्यास सांगितले. तेव्हा आरोपी येथे आले. शिवीगाळ करुन रवि अहिरे यास डोक्यावर दगड मारुन दुखापत केली.  म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Clashes in Malegachi two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.