वनारवाडी प्राथमिक शाळेचा वर्ग भरतोय मंदिराच्या सभामंडपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 09:59 PM2020-07-26T21:59:23+5:302020-07-27T00:16:31+5:30
लखमापूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वनारवाडी येथील शाळेतील शिक्षक कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध आॅनलाईन व आॅफलाईन माध्यमातून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्र मांतर्गत शिक्षकांनी आॅनलाईन व्हॉट्सअॅप ग्रुप, गल्ली मित्र व प्रत्यक्ष संवाद साधून पालक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने घरोघर फिरून अध्यापन करीत आहेत.
खंडेराव मंदिर परिसरातील सभामंडपात भरलेल्या वर्गाला भेट देऊन मार्गदर्शन करतांना सरपंच दत्तात्रय भेरे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भास्कर घोलप. समवेत वर्गशिक्षक सुनंदा अहिरे, विलास जमदाडे व विद्यार्थी.
लखमापूर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वनारवाडी येथील शाळेतील शिक्षक कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विविध आॅनलाईन व आॅफलाईन माध्यमातून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत. ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्र मांतर्गत शिक्षकांनी आॅनलाईन व्हॉट्सअॅप ग्रुप, गल्ली मित्र व प्रत्यक्ष संवाद साधून पालक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने घरोघर फिरून अध्यापन करीत आहेत.
गावातील खंडेराव मंदिर परिसरात सोशल डिस्टन्स ठेवून भरविण्यात आलेल्या वर्गास उपसरपंच दत्तात्रय भेरे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भास्कर घोलप यांनी भेट घेऊन समाधान व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, मोहाडी बीटाच्या शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप व केंद्रप्रमुख एस. एन. कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनारवाडी येथे शारीरीक अंतर ठेवून तसेच मास्क वापरु न विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जात आहे. तसेच शिक्षक घरोघर फिरून दिक्षा अॅप व टेलिग्रामवरील तंत्रसेतू- नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल कसे हाताळावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. खंडेराव मंदिर परिसरात पालकांच्या संमतीने उपस्थित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणींचे निरसन व अभ्यास कसा करावा हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात येत आहे. भाऊसाहेब नांदूरकर, विलास जमदाडे, सुनंदा घोलप व सुनंदा अहिरे आदी शिक्षकांनी शाळा स्तरावर नियोजन करून आठवड्यातून किमान दोन दिवस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केलेले आहे. त्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत नसल्याने शाळेच्या या उपक्र माचे परिसरातील पालक वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.