नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे बँकेत वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:57 PM2020-11-13T23:57:24+5:302020-11-13T23:57:45+5:30

जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या वतीने देण्यात आले.

Classes in the bank of money of damaged farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे बँकेत वर्ग

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे बँकेत वर्ग

Next

निफाड : जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या वतीने देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे करण्यात आले होते. परंतु नुकसानभरपाईची रक्कम एक वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नव्हती. ४,१८४ बाधित शेतकऱ्यांना सुमारे ७ कोटी ७५ हजार ९४२ इतकी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली असून, उर्वरित १,५९४ बाधित शेतकऱ्यांना सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार ८३२ इतकी रक्कम जमा करणे बाकी असून, लवकरात लवकर ही रक्कम संबधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.

Web Title: Classes in the bank of money of damaged farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.