चांदवड शहरात वर्ग बंद, तालुक्यात स्थानिक पातळीवर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:48+5:302021-07-15T04:11:48+5:30
या सभेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार चांदवड केंद्रातील शाळा सुरू करता येईल ...
या सभेत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार चांदवड केंद्रातील शाळा सुरू करता येईल किंवा कसे याबाबत आढावा घेतला असता चांदवडमध्ये कोविड रुग्ण असल्याने व शहर कोरोनामुक्त नसल्याने वरील वर्ग सध्या सुरू करता येऊ शकत नाही असे ठरले. परंतु तरीदेखील कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर शाळा सुरू होतील, अशी आशा असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी पूर्वतयारी करावी अशी सूचना देण्यात आली. त्यानुसार शाळा व परिसर स्वच्छता, सॅनिटायझेशन, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, सामाजिक अंतर, दोन मास्क वापरणे व इतर सर्व बाबींची पूर्तता शाळेने करावी असे सूचित करण्यात आले. चांदवड तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण नाहीत अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक ग्रामशिक्षण समिती, सरपंच व ग्रामस्थ यांची समिती गठित करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे वतीने सांगण्यात आले.
------14 एम.एम.जी 2- चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयात वर्ग सॅनिटाइझ करताना कर्मचारी.
140721\14nsk_23_14072021_13.jpg
१४ एमएमजी २