बुधवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:25+5:302021-01-25T04:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून, आता जिल्हा परिषद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून, आता जिल्हा परिषद व महापालिकेच्या शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असून, शहरातील सुमारे ४०५ ,तर ग्रामीण भागातील १९२३ शाळा सुरू होणार आहे. या सर्व शाळा सुरू करण्याची जवळपास पूर्ण झाली असून शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे काम अंतीम टप्प्यात आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे ७ हजार ४३६, तर शहरी भागांतील २ हजार ६०२ असे एकूण १० हजार ३८ शिक्षक आहेत. या सर्वांती शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार सध्या शासकीय व खासगी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणीची प्रक्रिया सुरू. ज्या शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अशा शिक्षकांना २७ जानेवारीपासून वर्ग सुरू करता येणार आहे. मात्र ज्याशिक्षकांचे कोरोना चाचणीचे अहवाल २७ जानेवारीनंतर प्राप्त होतील असे शिक्षक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच शाळेत येणार असल्याचे मनापाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार असल्याच तरी शाळांमध्ये दिवसाआड पद्धतीने शिकविले जाणार आहे.
नववी ते बारावीपर्यंतचे सुरू झाल्यानंतर काेराेना नियमांचे पालन याेग्य हाेत असल्याने कोरोनाचा प्रसार शाळांमधून होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचेही वर्ग सुरू होणार आहे. मात्र शाळांनी पालकांचे विद्यार्थ्याला शाळेत पाठविण्यासंदर्भातील संमतिपत्र घेणे अनिवार्य असून, शाळांमध्ये सॅनिटायझर, मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे.
पाचवी ते आठवीचे शिक्षक, विद्यार्थी
- शहर - ग्रामीण
शिक्षक - २,६०२ - ७४३६
शाळा - ४०५ - १९२३
विद्यार्थी - १,१०,७७३ - ४,७७६३०
इन्फो -
शहरातील १ हजार ७८ शिक्षकांची चाचणी
नाशिक शहरातील १ हजार ७८ शिक्षकांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात मनपा व खासगी व्यवस्थापनाच्या एकूण ४०५ शाळांमधील शिक्षकांचा समावेश आहे. मनपाच्या १०२ शाळांमधील ५९३ शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून, खासगी व्यवस्थापनाच्या ३०३ शाळांमधील ४८५ शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे. असा प्रकारे आत्तापर्यंत १ हजार ७८ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. यातील कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आलेले शिक्षक २७ जानेवारीपासून आपआपल्या शाळेत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करणार आहेत. तर ज्या शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल २७ जानेवारीपूर्वी प्राप्त होणार नाही असे शिक्षक अहवाल प्राप्त झाल्यानंतर शाळेत येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली आहे.