‘स्वरांकुर’मधून शास्त्रीय संगीताचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:56 AM2018-11-06T00:56:21+5:302018-11-06T00:56:36+5:30

भारतीय शास्त्रीय संगीत जगातील सर्वोत्तम प्राचीन कलाकृतींपैकी एक आहे. त्याच्या सौंदर्य आणि मनोरंजक गुणधर्मांबरोबर संगीताची मानसिक, बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता आहे.

 Classical music lessons from 'Swankur' | ‘स्वरांकुर’मधून शास्त्रीय संगीताचे धडे

‘स्वरांकुर’मधून शास्त्रीय संगीताचे धडे

Next

नाशिक : भारतीय शास्त्रीय संगीत जगातील सर्वोत्तम प्राचीन कलाकृतींपैकी एक आहे. त्याच्या सौंदर्य आणि मनोरंजक गुणधर्मांबरोबर संगीताची मानसिक, बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देण्यासाठी इस्पॅलियर शाळेत पाडवा पहाटच्या धर्तीवर ‘स्वरांकुर’चे आयोजन करून दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत, नृत्य तसेच तबलावादन करून उपस्थितांची मने जिंकून शास्त्रीय संगीताचे धडे गिरविताना विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत व नृत्य सादरीकरण केले. आशिष रानडे, दीपा बक्षी आणि रसिक कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्रमुख सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्र म पार पडला.

Web Title:  Classical music lessons from 'Swankur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.