मातीची पाटी डोक्यावर, कोरोनाची भीती मनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:01 PM2020-05-26T21:01:06+5:302020-05-27T00:03:11+5:30
पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे वारंवार जाहीर होणारे लॉकडाउन त्यातच हाताला काम व पोटाला भाकर नसल्याने शेकडो किलोमीटरची पायपीट करीत गाव गाठलेल्या आदिवासी शेतमजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांनी काही प्रमाणात हातभार लावला असून, पंचायत समितीच्या वतीने ३७८ कामांवर जवळपास अडीच हजार मजूर सध्या कामावर आहेत.

पेठ तालुक्यात २०२०-२१ मध्ये प्रस्तावित घरकूल, गाळ काढणे, वैयक्तिक विहीर खोदाई, दगडी बांध, वृक्षसंगोपन आदी कामांवर मजूर काम करीत असून ७५ कामांचे नव्याने प्रस्ताव दाखल करण्यात आले
आहेत. तर वनविभाग व कृषी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामावर ५५२ मजूर काम करत असल्याचे तहसीलदार संदीप भोसले यांनी सांगितले, मात्र पंचायत समितीसह तालुक्यातील मोजक्याच शासकीय विभागांनी रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली
आहे. सध्याचे लॉकडाउनचे संकट आणि बेरोजगारी यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सर्वच विभागांनी प्रशासकीय प्रक्रि या पूर्ण करून कामे सुरू करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-------------------------------------
सुरक्षा साधने पुरविण्याची मागणी
शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता फैलाव होत असताना पेठ तालुक्यात मात्र अजून एकही रु ग्ण आढळून आला नसला तरी नागरिकांमध्ये भीती कायम आहे. गावागावांत या संदर्भात जनजागृती केली जात असून, उपाययोजनाही केल्या जात आहेत. कोरोनाच्या भीतीने घरात बसून घरखर्च कसा भागवणार या विवंचनेत असलेले मजूर मातीच्या पाटीबरोबर कोरोनाचे संकटही डोक्यावर घेत घराबाहेर पडले आहेत. अशा मजुरांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्याची मागणी केली जात आहे.