स्वच्छ ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार वितरण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 06:12 PM2018-11-17T18:12:16+5:302018-11-17T18:12:44+5:30

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७-१८ अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा बागलाण तालुका पंचायत समिती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाला. या अंतर्गत तालुक्यातील चौंधाणे गाव ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून, मुंगसे गाव ग्रामपंचायतीस द्वितीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

Clean Gram Talukastraya Award for Excellence | स्वच्छ ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार वितरण उत्साहात

स्वच्छ ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार वितरण उत्साहात

Next

कंधाणे : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७-१८ अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा बागलाण तालुका पंचायत समिती सभागृहात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात झाला. या अंतर्गत तालुक्यातील चौंधाणे गाव ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून, मुंगसे गाव ग्रामपंचायतीस द्वितीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
आव्हाटी गाव ग्रामपंचायतीस तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अभियानांतगर्त जिल्हा व तालुक्यातील ग्रामपंचायतीची पाहणी करण्यात आली होती. ह्यात गावातील आरोग्य शैक्षणिक सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गावांतर्गत रस्ते, गावातील शैक्षणिक व्यवस्था, गावातील वृक्ष संवर्धन, तीर्थक्षेत्र वाचनालय, अंगणवाडी, जिप शाळा ह्या बाबींची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीने पाहणी करून तालुकास्तरीय विजेता गावाची व ग्रामपंचायतीची घोषणा केली होती.
यातील बागलाण तालुक्यातील चौंधाणे व मुंगसे ग्रामपंचायतीने प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त केला होता. पुरस्कार वितरणांतर्गत तालुक्यात प्रथम आलेल्या चांैधाणे ग्रामपंचायतीस एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय मुंगसे ग्रामपंचायतीस पन्नास हजार रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय पुरस्कार आव्हाटी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला असून, पुरस्कार पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण बागलाण पंचायत समितीच्या सभापती विमलताई सोनवणे व गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्र मास चांैधाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच लीलावती मोरे, उपसरपंच रवींद्र मोरे, मुंगसे ग्रामपंचायतीच्या सरपंच चाफाबाई सोनवणे, उपसरपंच मोहिनी निकम, आव्हाटी ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम भामरे, उपसरपंच गोकुळ भामरे, पंचायत समितीच्या उपसभापती शीतलताई कोर, सदस्य कान्हू आहिरे, अतुल आहिरे, वसंतराव पवार, माणिक आहिरे, पंडित आहिरे, संजय जोपळे, रामदास सूर्यवंशी, वैशाली महाजन, जिजाबाई सोनवणे, ज्योती आहिरे, मीनाबाई सोनवणे, कल्पना सावंत, केदूबाई सोनवणे, स्वच्छ भारत कक्षाचे वैभव पाटील, कैलास सैंदाणे, विस्तार अधिकारी आर. एच. खैरनार, व्ही. पी. जाधव, ग्रामसेवक एन. सी. वाघ, पंकज पवार, जयश्री पवार व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो १७ कंधाणे)

Web Title: Clean Gram Talukastraya Award for Excellence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.