नववर्षानिमित्त विश्रामगडावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:18+5:302021-01-03T04:15:18+5:30
नांदुरवैद्य : गडकिल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रेणित राजयोग प्रतिष्ठान नववर्षाचे स्वागत करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवत विश्रामगड ...
नांदुरवैद्य : गडकिल्ले स्वच्छता मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रेणित राजयोग प्रतिष्ठान नववर्षाचे स्वागत करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवत विश्रामगड परिसर उजळून टाकला.
येथील युवकांनी चार वर्षांपासून सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेत इतिहासकालीन गड, किल्ले इतिहासकालीन बुरुजे आदी ठिकाणी हा उपक्रम राबवत असून, या आधीही या युवकांनी विश्रामगड, शिवनेरी, सिंहगड आदी. महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली आहे. यानंतर, या युवकांनी संपूर्ण विश्रामगडाला हारा फुलांच्या माळांनी सजावट केली. त्यानंतर, या वर्षी आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे मृत्यू झालेल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील इतिहासकालीन साक्ष देणारा विश्रामगड किल्ला येथे या तरुण युवकांनी संपूर्ण किल्ल्याच्या परिसराची स्वच्छता करत परिसर उजळून टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर, पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सामूहिक आरती करण्यात आली. याप्रसंगी राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते, वैभव दातीर, यश ठोके, ईश्वर गवते, आकाश मालुंजकर, सोनच गवते, अक्षय लोटे आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.
------------------
विश्रामगडावर स्वच्छता मोहीम राबवताना आत्माराम मते, वैभव दातीर, ईश्वर गवते, यश ठोके आदी. (०२ नांदूरवैद्य ४)
===Photopath===
020121\02nsk_7_02012021_13.jpg
===Caption===
०२ नांदूरवैद्य ४