खंडोबा टेकडीवर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:26 AM2019-11-10T01:26:33+5:302019-11-10T01:26:50+5:30

देवळालीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले डेंग्यूचे रुग्णांची संख्या लक्षात घेता रोगाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘डेंग्यू मुक्त देवळाली- एक प्रयत्न’ या उपक्र मांतर्गत सकाळपासून खंडेराव टेकडी येथील पायऱ्या व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवीत गावात निर्मूलन करण्यात आले.

Cleaning expedition on Khandoba hill | खंडोबा टेकडीवर स्वच्छता मोहीम

खंडोबा टेकडीवर स्वच्छता मोहीम

Next

देवळाली कॅम्प : देवळालीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले डेंग्यूचे रुग्णांची संख्या लक्षात घेता रोगाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘डेंग्यू मुक्त देवळाली- एक प्रयत्न’ या उपक्र मांतर्गत सकाळपासून खंडेराव टेकडी येथील पायऱ्या व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवीत गावात निर्मूलन करण्यात आले.
खंडेराव टेकडी येथे दररोज व्यायामासाठी येणाºया अण्णाज टेम्पल हिल ग्रुपच्या सदस्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शविल्यानंतर मोहिमेचे प्रमुख सुशील चव्हाण व राजू फल्ले यांनी आपल्या सर्व साहित्यासह पुढील महिन्यात चंपाषष्ठीनिमित्त होत असलेल्या खंडेराव टेकडी येथील यात्रोत्सवाच्या पार्श्वंभूमीवर येथे मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सकाळी ७ वाजता अण्णाज टेम्पल हिल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नागेश देवाडिगा, रामनिवास सारडा, नीलेश गायकवाड, अनिल पाळदे, नवीन नागपाल, संजय माथूर आदींसह अन्य सदस्यांनी सहभाग नोंदवित टेकडीवर चढण्यासाठी असलेला मागचा मार्ग, पायºया व मंदिर परिसरात गवत काढले व डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून रासायनिक औषधांची फवारणी केली.

Web Title: Cleaning expedition on Khandoba hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.