त्र्यंबकेश्वरला गोदावरीची सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:08 PM2020-05-11T21:08:52+5:302020-05-11T23:36:24+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेने पावसाळापूर्व गोदावरी, अहिल्या नदी साफसफाईचे काम तसेच गावातील नाले-ओहोळ सफाई मोहीम हाती घेतली असून, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कामाला गती देण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेने पावसाळापूर्व गोदावरी, अहिल्या नदी साफसफाईचे काम तसेच गावातील नाले-ओहोळ सफाई मोहीम हाती घेतली असून, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कामाला गती देण्यात आली आहे.
यापूर्वी पावसाळापूर्व नाले सफाईचे ठेके देण्यात येत होते. पण समाधानकारक कामकाज होताना दिसून येत नव्हते. परिणामी पावसाळ्यात जोरदार पाउस आल्यास गावातील म्हातार ओहोळ, तेली गल्लीमधील निलगंगा, गोदावरी व अहिल्या आदींना पाण्याचा मोठा प्रवाह असे. नदीपात्रातील गाळ काढला जात नसल्याने संपूर्ण गावात पाणीच पाणी चोहीकडे असा प्रसंग उद्भवत असे. थेट नदीपात्रात लोकांनी केलेले अतिक्र मण, पात्रात फेकलेले भंगार सामान यामुळेही पात्र संकुचित होऊन त्यातील पाणी हे घराघरांमध्ये शिरत असे. विशेष म्हणजे तेलीगल्ली, बाजारपट्टी, गोकुळदास लेन, कुशावर्त परिसर, मेनरोड, डॉ. आंबेडकर चौक, अमृतकुंभ नगर परिषद कार्यालयासमोर आदी भागात पाणी मोठ्या प्रमाणावर साचत असे.
यावेळेस आरोग्य विभागाने नियोजन बध्द पद्धतीने संपुर्ण नाले सफाईचे काम हाती घेतले आहे. यावर्षी जेसीबी लाउन नदीपात्रात खोदाई करु न पात्र पहिल्यासारखे रु ंद करण्यात आले आहे.
------------------------------------
४मेनरोड कुशावर्तमार्गे नदीपात्र स्वच्छता करण्याचे काम त्र्यंबकेश्वर मंदिर, अहिल्या, गोदावरी, खुला संगमघाट, स्मशानभूमी ते पेट्रोलपंपाच्या पुढे सुरू राहणार आहे. लवकर काम सुरू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात जाऊन मोठ्या प्रमाणात माती, भंगार माल बाहेर काढला असून, सध्या मातीचे ढीग काढण्याचे काम चालू आहे.