इतिहासकालीन आड किल्ल्यावर राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:32+5:302021-06-16T04:18:32+5:30
सिन्नर तालुक्यातील शिवकालीन इतिहास लाभलेल्या समुद्र सपाटीपासून १२३४ मीटर उंच असलेल्या आड किल्ल्यावर शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती संस्थेच्या वतीने ...
सिन्नर तालुक्यातील शिवकालीन इतिहास लाभलेल्या समुद्र सपाटीपासून १२३४ मीटर उंच असलेल्या आड किल्ल्यावर शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती संस्थेच्या वतीने शिवकालीन पाण्याच्या १६ टाक्यांपैकी काही टाक्यांचे खोदकाम करीत त्या स्वच्छ करण्यात आल्या. आडवाटेवर असलेला पण तितकाच रमणीय असा हा आड किल्ला आहे. आडवाडी हे पायथ्याचे गाव, किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असलेली साधारण ७५ पाण्याची जोडटाकी आहेत. गडावर पाहण्यासारखे किल्ल्यावर आडवाडी गावाच्या दिशेने एका कड्यात विस्तीर्ण गुहा असून, आतमध्ये देवीचे मंदिर आहे. या गुहेतच पाण्याचे टाके असून, गुहेच्या शेजारी एका साधूने एक खोली बांधलेली आहे. शिवदुर्ग संस्थेकडून या किल्ल्यावरील शिवकालीन परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष श्याम गव्हाणे, मनोज वाघ, सतीश वाजे, प्रवीण गिते, नितीन बोडके, सुनील घुगे, सिद्धार्थ, अनभवने, दीपक मोरे, राहुल कांबळे, मोहन जाधव, निनाद सावंत, कुलदीप राठोड, लखन पाळदे, विजय दराने, भरत सहाणे आदींसह सदस्य सहभागी झाले होते.
छायाचित्र - १४ नांदूरवैद्य १
शिवकालीन आड किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करताना श्याम गव्हाणे, सतीश वाघ, नितीन बोडके, मोहन जाधव आदी.
===Photopath===
140621\14nsk_7_14062021_13.jpg
===Caption===
शिवकालीन आड किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करतांना शाम गव्हाणे, सतीष वाघ, नितीन बोडके, मोहन जाधव आदी.