लासलगावी कीर्तन सोहळ्यासह धार्मिक स्थळांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 08:21 PM2021-02-01T20:21:30+5:302021-02-02T00:52:43+5:30
लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २५व्या स्मृती सोहळ्या अंतर्गत कीर्तन सोहळ्यासह लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या सहभागाने शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली.
लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या २५व्या स्मृती सोहळ्या अंतर्गत कीर्तन सोहळ्यासह लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या सहभागाने शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली. कै. लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या पुतळ्यास सीताराम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयात वारकरी महामंडळ समिती प्रमुख कीर्तनकार हभप श्रावण महाराज अहिरे (कुकाणे) मालेगाव यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हभप प्रभाकर काकडे यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जनार्दन जगताप तर प्रमुख अतिथी म्हणून केदू जगताप, अरविंद देसाई, निवृत्ती सावकार, भागवतराव होळकर, रंगनाथ कोपुलकर, मोतीराम डोंगरे, उत्तम जाधव, दिलीपराव पानगव्हाणे, अर्जुन माळी, विठ्ठलराव नागरे, भास्कर पवार, दीपक शिरापुरे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पं.स. सदस्य रंजना पाटील, संचालक नीताताई पाटील, पुष्पाताई दरेकर, शंतनू पाटील, लक्ष्मण मापारी, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, प्राचार्य विश्वासराव पाटील, मुख्याध्यापक संजीवनी पाटील, अनिस काझी, पर्यवेक्षक दत्तू गांगुर्डे, सुधाकर सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीहरी शिंदे तर दत्ता महाराज मरकड यांनी स्वामी महाराजांचा परिचय करून दिला. यावेळी परिसरातील नागरिक कीर्तन सोहळ्यासाठी उपस्थित होते.