शुद्धीकरण केंद्रासह जलकुंभाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:05 PM2020-07-15T21:05:10+5:302020-07-16T00:13:29+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने जंतुमिश्रित पाणीपुरवठ्याची दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र व गावातील जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. जलकुंभाची स्वच्छता करण्यात आल्याने गुरुवारी (दि.१६) कोरडा दिवस पाळला जाणार असून, त्या दिवशी गावात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.

नांदूरशिंगोटे गावातील नळांना मंगळवारी जंतुमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. नळाद्वारे चक्क जिंवत अळ्या आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्यात आली आहे. गावाला कणकोरीस पाचगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. सदरची योजना भोजापूर धरणातून राबविण्यात आली असून, चास खिंडीत योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दरम्यान, बुधवारी (दि. १५) सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच रंजना शेळके, ग्रामविकास अधिकारी एस. डी. आहिरे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे यांनी जंतुमिश्रित पाणी-पुरवठ्याची दखल घेत सकाळीच जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली व तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी तसेच खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने जलशुद्धीकरण केंद्रातील उपकरणांची पावडरच्या साहाय्याने स्वच्छता केली. तसेच नांदूरशिंगोटे येथील गावाला पाणीपुरवठा करणाºया दोन्हीही जलकुंभाची स्वच्छता केली.
-------------------
नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: दिवसभर थांबून मोहीम राबवून घेतली. पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथरोग पसरू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
जलकुंभाची स्वच्छता झाल्याने एक दिवस त्यामध्ये पाणी साठवले जाणार नाही. त्यामुळे गुरु वारी गावाला पाणीपुरवठा होणार नसल्याने महिला व ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.