सोमवारी स्वच्छता अभियान मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:26 AM2017-09-12T00:26:18+5:302017-09-12T00:26:32+5:30
जनजागृती : दर तीन महिन्यांनी राबविणार अभियान नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी सोमवार, दि. १८ रोजी नाशिक शहर व काही नगरपालिकांच्या हद्दीत एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली.
जनजागृती : दर तीन महिन्यांनी राबविणार अभियान
नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी सोमवार, दि. १८ रोजी नाशिक शहर व काही नगरपालिकांच्या हद्दीत एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली.
जिल्हाधिकाºयांनी आज या संदर्भात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या अधिकाºयांची बैठक घेतली व त्यांची याबाबतची मते जाणून घेतली. या मोहिमेंतर्गत प्रामुख्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
या मोहिमेत जिल्हा परिषद, महापालिका कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक, एनसीसी, गृहरक्षक दल व सामान्य व्यक्तींनाही सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी ठिकाणे निश्चित करण्याचे काम केले जात असून, स्वच्छतेसाठी लागणारी सामग्री महापालिका पुरविणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. सदरची मोहीम एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता दर तीन महिन्यांनी अशाप्रकारे अभियान राबवून स्वच्छतेबाबत जागृतीला हातभार लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. या मोहिमेंतर्गत गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही हाती घेण्यात येणार असून, ज्या ज्या ठिकाणी गोदावरीत सांडपाणी मिसळले जाते अशी ठिकाणे निश्चित करून त्यावर कार्यवाहीसाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. गेल्या वर्षी केवळ ४, तर यंदा ६९ बळीनाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी स्वाइन फ्लूचे फक्त चार मृत्यू झाले होते. यंदा ६९ मृत पावले आहेत. आजवर ३२८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मृतांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत २४ असून, २० ग्रामीण भागात तर अन्य पर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. येणाºया काळात स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण असणार असल्याने जनजागृती केली जाणार आहे.