स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोदाघाट परिसरात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:58 AM2018-12-18T00:58:14+5:302018-12-18T00:58:35+5:30
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियान सुरू असून, त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी गंगाघाट परिसरात हिंदुस्थान एरोनेटिक लिमिटेड वायुयान प्रभाग ओझर व पंचवटी घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पंचवटी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियान सुरू असून, त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी गंगाघाट परिसरात हिंदुस्थान एरोनेटिक लिमिटेड वायुयान प्रभाग ओझर व पंचवटी घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत एचएएलचे अपर महाप्रबंधक एच. एल. सूर्यप्रकाश, उपमहाप्रबंधक एस. चंदेल, जितेंद्र मोरे, प्रबंधक विठ्ठल बनसोड, अशोक गावंडे, एस. पी. अहेर, नितीन पाटील उपस्थित होते. विभागीय स्वच्छता संजय दराडे, किरण मारू यांच्या उपस्थितीत स्वच्छता करून कचरा घंटागाडीद्वारे नेण्यात आला. मोहिमेत ६० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.
स्वच्छतेची शपथ
प्रारंभी गोदावरी परिसरातील रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण भागात स्वछतेबाबत रॅली काढून सामूहिक स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण परिसरात स्वच्छता करण्यात आली.