लोहगडावर राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:36 AM2019-02-20T00:36:10+5:302019-02-20T00:39:55+5:30
घोटी : दहशतवादी लोकांना कंठस्नान घालण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा हे साकडे घालीत घोटीच्या कळसूबाई मित्रमंडळाने शिवजयंती साजरी केली. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील मळवली येथील शिवरायांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगडावर शिवजयंती साजरी केली.

यावेळी गिर्यारोहकांनी शिवरायांना जन्माला येण्याचे साकडे घातले. याप्रसंगी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यात आली. कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी डॉल्बी, डीजे आदी वायफळ खर्चाला फाटा देत लोहगड पादाक्र ांत केला. घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी लोहगडावर चढाई केली. दिवसभर गडावरील भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
रात्री शिवरायांच्या कर्तृत्वावरील गीतांचे गायन करून कार्याला उजाळा देण्यात आला. आज सकाळी सर्व कार्यकर्त्यांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अभिजित कुलकर्णी, अशोक हेमके, डॉ. महेंद्र आडोळे, प्रवीण भटाटे, अर्जुन कर्पे, गोकुळ चव्हाण, बाळू आरोटे, दत्ता शिंदे, सुरेश चव्हाण, बालाजी तुंबारे, संतोष म्हसणे, प्रशांत जाधव, सोमनाथ भगत, गोविंद चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, राहुल हांडे, नितीन गायकर, जावेद मणियार आदी गिर्यारोहक सहभागी झाले.