नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम सक्तीची  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:38 PM2017-12-26T14:38:48+5:302017-12-26T14:42:26+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून अधून मधून शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदी, नाले स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर राबविण्यात येते, एका दिवसापुरता मर्यादित असलेली या स्वच्छता मोहिमेतुन कचरा गोळा करण्यापेक्षा प्रसिद्धीची हौसच संबंधितांकडून भागवून घेतली जात

Cleanliness campaign in Nashik Collectorate is compulsory | नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम सक्तीची  

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम सक्तीची  

googlenewsNext
ठळक मुद्देगैरहजर कर्मचा-यांना नोटीसा : महसूल खात्यात रोषगैरहजर असलेल्या कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी कारणे दाखवा नोटीस

नाशिक : २ आॅक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत केलेल्या परिसर स्वच्छतेच्या कामात गैरहजर असलेल्या कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत मोहिमेंतर्गंत आयोजीत केलेली स्वच्छता मोहीम नागरिकांना सक्तीची की ऐच्छिक असल्याचा वादाचा मुद्दा पुढे आला आहे. स्वच्छता मोहीम सक्तीचीच असेल तर मग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमण्याची गरज नाही, अधिकारी कर्मचा-यांनी दररोज येऊनच स्वच्छता केली पाहिजे अशी संतप्त भावनाही कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरूवात केली असून, त्याचाच भाग म्हणून अधून मधून शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदी, नाले स्वच्छ करण्याची मोहीम शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर राबविण्यात येते, एका दिवसापुरता मर्यादित असलेली या स्वच्छता मोहिमेतुन कचरा गोळा करण्यापेक्षा प्रसिद्धीची हौसच संबंधितांकडून भागवून घेतली जात असल्याचे आजवरच्या मोहिमेंतून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने २ आॅक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वच्छता मोहिम राबविण्याचे ठरविले व तसे पत्र प्रत्येक खातेप्रमुखांना पाठवून त्यांना त्यांच्या पातळीवर कार्यालयाची स्वच्छता तसेच आवारात स्वच्छतेच्या सुचना करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी काही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर काहींना या कार्यबाहुल्यामुळे या कार्याकडे पाठ फिरविल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेल्या माहितीतुन उघड झाली. खुद्द जिल्हाधिकारी हातात झाडू घेत कचरा काढत असताना काही अधिकारी व कर्मचा-यांनी स्वच्छतेची बाब गांभीर्याने न घेतल्याचे कारण पुढे करून दोन महिन्यानंतर स्वच्छता मोहिमेस गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीसा बजावल्या आहेत. स्वच्छता मोहिमेस गैरहजर असण्यामागचे कारण या नोटीसीद्वारे विचारण्यात आले असून, त्याचे योग्य लेखी कारण समोर न आल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची धमकीही देण्यात आली आहे.

Web Title: Cleanliness campaign in Nashik Collectorate is compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.