नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:23 PM2017-08-08T23:23:34+5:302017-08-09T00:17:08+5:30
नेहरू युवा केंद्र आणि बागलाण शैक्षणिक, सामाजिक, कला व क्रीडा मंडळ संचलित बागलाण अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ येथील तहसीलदार कार्यालयाजवळ करण्यात आला.
सटाणा : नेहरू युवा केंद्र आणि बागलाण शैक्षणिक, सामाजिक, कला व क्रीडा मंडळ संचलित बागलाण अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता सप्ताहाचा शुभारंभ येथील तहसीलदार कार्यालयाजवळ करण्यात आला.
देशपातळीवर स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात येत असून, केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळमंत्री विजय गोयल यांच्या निर्देशानुसार शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभियानांतर्गत येत्या पंधरा दिवसात शहरातील विविध सार्वजनिक आणि शासकीय ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून तेथील घाण-कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक एच. एम. पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाध्यक्ष हेमंत गायकवाड, देवळा तालुकाध्यक्ष भास्कर भामरे, सहायक पोलीस निरीक्षक के. बी. घायवट, प्रा. रजिवान शेख आदी उपस्थित होते. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख आनंदा महाले यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीस उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन आवारांत स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी वर्गासह अकॅडमीचे निर्देशक राहुल महाले, जयवंत सोनवणे, राकेश शिरोळे आदी उपस्थित होते.