निकवेल येथे स्वच्छता अभियान

By admin | Published: October 20, 2016 12:02 AM2016-10-20T00:02:57+5:302016-10-20T00:18:37+5:30

निकवेल येथे स्वच्छता अभियान

Cleanliness campaign at Nekeel | निकवेल येथे स्वच्छता अभियान

निकवेल येथे स्वच्छता अभियान

Next

 निकवेल : येथे स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. दिवाळी येऊन ठेपल्याने ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान राबविले आहे.
ग्रामसेवक एम. आर. वाघ यांनी गावामधील संपूर्ण वॉर्डाची पाहणी केली. त्यांना अस्वच्छता आढळून आली. सरपंच रामचंद्र मोरे, उपसरपंच इंदूबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य भिकूबाई म्हसदे, दीपक वाघ यांची बैठक घेतली. गावामध्ये कीटकनाशक फवारणीला सुरुवात केली. आदिवासी वस्तीत खालच्या आदिवासी वस्तीसह सर्व भागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही अशा कुटुंबाला दारावर स्वच्छता भारत मिशन (ग्रामीण) खतरा स्टिकर लावण्यात येत आहे. ज्यांच्याकडे शौचालय आहे त्यांच्या घरांच्या दारावर ‘लय भारी’चे स्टिकर लावण्यात येत आहे.
यावेळी पंचायत समिती
सदस्य भास्कर बच्छाव, सुनील
वाघ, तुषार सोनवणे, भिका वाघ, जगदीश वाघ, रवींद्र वाघ, विवेक सोनवणे, नीलेश वाघ आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Cleanliness campaign at Nekeel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.