यात्रोत्सवानंतर पाथरे ग्रामस्थांकडून स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:36 PM2019-01-01T17:36:45+5:302019-01-01T17:36:58+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव आटोपल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आठवडाभर चाललेल्या यात्रोत्सव काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव आटोपल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
आठवडाभर चाललेल्या यात्रोत्सव काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता. हा कचरा आरोग्यास घातक ठरू शकतो हे विचार करून गावातील ग्रामस्थांनी परिसर स्वच्छ केला. यावर्षीचा यात्रोत्सव आवर्तन पद्धतीने पाथरे खुर्द गावाकडे आला होता. योग्य नियोजन पद्धतीने पार पडलेल्या या यात्रोत्सवात पार पडला.
यात्रा संपल्यावर गावातील काही ग्रामस्थांनी येथील मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. हातात झाडू, पाट्या घेऊन ग्रामस्थांनी एकत्र येऊन साधारण दोन ते तीन एकरचा परिसर स्वच्छ केला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हे स्वच्छ अभियान राबविण्यात आले. पाथरे खुर्दचे उपसरपंच तथा यात्रा समितीचे अध्यक्ष सुकदेव गुंजाळ, उपाध्यक्ष सतीश चिने, संतोष बारहाते, संजय दवंगे, बाबासाहेब चिने, अक्षय गोसावी, सुभाष बारहाते, स्वप्नील दवंगे, योगेश सोनवणे, तुषार खेडकर, सतीश गुंजाळ, सौरभ बारहाते, आनंद पुरी, महेश गायकवाड यांच्या सह नववधू वर किरण येवले, स्वाती येवले आदींनी स्वच्छतेसाठी परिश्रम घेतले. स्वच्छता ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून माझीही जबाबदारी आहे, ही भावना प्रत्येक नागरिकात निर्माण व्हावी या हेतूने ग्रामस्थ एकत्र आले.