येवला शहरात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:02 AM2017-09-26T00:02:31+5:302017-09-26T00:24:51+5:30
स्वच्छ भारत अभियानास तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येवला : स्वच्छ भारत अभियानास तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी दिलीप मेनकर, नगरसेवक गणेश शिंदे, शिफक शेख, प्रवीण बनकर, रु पेश लोणारी, अमजद शेख, प्रमोद सस्कर, सचिन शिंदे, छाया क्षीरसागर, पद्मा शिंदे, निसार शेख यांच्यासह मुक्तानंद महाविद्यालयाचे प्राचार्य बी. बी. रहाणे, एन्झोकेम विद्यालयाचे प्राचार्य विजय नंदनवार, मुख्याध्यापक राजेंद्र चिंचले, गौरव कांबळे, बाळू जगताप, उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत विद्यालय परिसर स्वच्छ करून अभियानाला सुरुवात केली. यानंतर सुरेश कोल्हे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी प्राध्यापक सुदाम पातळे व अजय विभांडिक यांनी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे पाच पथक तयार केले. या पथकांसह मान्यवरांनी सेनापती तात्या टोपे स्मारक, क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालय परिसर, हुडको वसाहत व प्रशासकीय इमारतीमध्ये स्वच्छता अभियान राबविले. दत्ता महाले यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य लिपिक बापू मांडवडकर यांनी आभार मानले. यावेळी उपमुख्याधिकारी आर. आय. शेख, स्वच्छता निरीक्षक एस. टी. संसारे, घनश्याम उंबरे, राजेश दाणेज, श्रावण जावळे, शिवशंकर सदावर्ते, सुरेश गोंडाळे, अशोक कोकाटे, दत्तात्रय गुंजाळ, प्रशांत पाटील, शशिकांत मोरे, श्रावण जावळे यांच्यासह स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.