ताहाराबाद महाविद्यालयात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 02:46 PM2019-10-02T14:46:32+5:302019-10-02T14:47:59+5:30
ताहाराबाद : मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फेमहात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ताहाराबाद : मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फेमहात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयात परिसर स्वच्छता करून या उपक्र माची सुरु वात करण्यात आली. यानंतर महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.एम.एल.साळी यांनी महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा आणि सत्याग्रह तत्वज्ञान बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्र म अधिकारी डॉ.गणेश लिंबोळे यांनी गांधीजींच्या विचारातील श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची असून याच श्रमप्रतिष्ठा आधारे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होणे शक्य आहे असा विश्वास व्यक्त केला. प्रा.डी.डी.बच्छाव, प्रा.एम.ए.अहिरे प्रा.डी.जी.भामरे यासह प्राध्यापक व प्रध्यापाकेत्तर कर्मचारी यांनी योगदान दिले. सूत्रसंचालन प्रा.निलेश निकम यांनी केले. प्रा.के.आर आढाव यांनी आभार मानले.