महापालिकेत ‘साफसफाई’ : मुंढेंच्या दणक्यानंतर सुटीच्या दिवशी मिशन जळमटे हटली; धूळ झटकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:20 AM2018-02-11T01:20:00+5:302018-02-11T01:20:32+5:30

नाशिक : छताला लागलेली जळमटे, कोपºयात-कपाटाच्यावर मिळेल तिथे कोंबून ठेवलेल्या फायलींचे गठ्ठे, काळेकुट्ट पंखे, टेबलच्या ड्रॉवरबाहेर डोकावणारी कागदपत्रे, टेबलांवर साचलेली धूळ.

'Cleanliness' in municipal corporation: After the release of the poster, the mission took place on holidays; Dust blows! | महापालिकेत ‘साफसफाई’ : मुंढेंच्या दणक्यानंतर सुटीच्या दिवशी मिशन जळमटे हटली; धूळ झटकली !

महापालिकेत ‘साफसफाई’ : मुंढेंच्या दणक्यानंतर सुटीच्या दिवशी मिशन जळमटे हटली; धूळ झटकली !

Next
ठळक मुद्दे खातेप्रमुखांची झाडाझडती नोकरी गमावण्यापेक्षा सुटी गमावलेली बरी

नाशिक : छताला लागलेली जळमटे, कोपºयात-कपाटाच्यावर मिळेल तिथे कोंबून ठेवलेल्या फायलींचे गठ्ठे, काळेकुट्ट पंखे, टेबलच्या ड्रॉवरबाहेर डोकावणारी कागदपत्रे, टेबलांवर साचलेली धूळ... असे ओंगळवाणे दर्शन महापालिकेत पहिल्याच दिवशी घडल्यानंतर नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खातेप्रमुखांची झाडाझडती घेतली आणि शनिवारी (दि.१०) महापालिका मुख्यालयातील साºया विभागांमध्ये ‘साफसफाई’साठी सारे हात झाडून कामाला लागले. साहेबांनी सुटी खराब केल्याची नाराजी कर्मचारी-अधिकाºयांच्या चेहºयावर असली तरी, नोकरी गमावण्यापेक्षा सुटी गमावलेली बरी, असा भाव मात्र दिसून आला. त्यामुळे दिवसभरात महापालिकेत साफसफाईचा माहोल होता. महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार शुक्रवारी (दि.९) तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर, दुपारच्या सत्रात त्यांनी मुख्यालयातील विविध विभागांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी मुंढे यांना विभागांमध्ये फायली अस्ताव्यस्त दिसून आल्या. कपाटांमध्ये दस्तावेज कोंबलेले आढळून आले.

Web Title: 'Cleanliness' in municipal corporation: After the release of the poster, the mission took place on holidays; Dust blows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.