नाशकात स्वच्छतेचा भार अवघ्या १७१२ कामगारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:41 PM2018-05-11T18:41:24+5:302018-05-11T18:41:24+5:30

महापालिका : समसमान वाटपानंतरही साफसफाईत अडचणी

Cleanliness in Nashik only 1712 workers | नाशकात स्वच्छतेचा भार अवघ्या १७१२ कामगारांवर

नाशकात स्वच्छतेचा भार अवघ्या १७१२ कामगारांवर

Next
ठळक मुद्देशहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीतशहराचा वाढता विस्तार पाहता सुमारे ३७०० सफाई कामगारांची निकड आहे. आउटसोर्सिंगने सफाई कामगारांची भरती करण्याचाही प्रश्न भिजत पडलेला आहे.

नाशिक : शहरातील १९०१ कि.मी. लांबीचे रस्ते झाडण्याचे काम अवघे १७१२ सफाई कामगार करीत आहेत. आरोग्य विभागाने विभागनिहाय सफाई कामगारांचे समसमान वाटप केले तरी, शहरातील पंचवटी, सिडकोसारख्या भागातील साफसफाई कामातील अडचणी सुटू शकलेल्या नाहीत. शहराचा वाढता विस्तार पाहता सुमारे ३७०० सफाई कामगारांची निकड आहे. आउटसोर्सिंगने सफाई कामगारांची भरती करण्याचाही प्रश्न भिजत पडलेला आहे.
महापालिकेत यापूर्वी १४७४ कामगार प्रत्यक्ष साफसफाईची कामे करायची, तर उर्वरित ३८९ कामगार हे सोयीनुसार अन्य विभागात काम करायचे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सफाई कामगार असूनही अन्य विभागात काम करणाऱ्या या ३८९ कामगारांच्या हाती झाडू सोपविण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यातील २३८ कामगारच प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागले, तर अद्यापही १५१ कामगार आहेत त्याच विभागात कार्यरत आहेत. नगरसेवकांच्या मागणीनुसार सफाई कामगारांचे विभागनिहाय समसमान वाटप करण्यात आले. त्यानुसार, सफाई कामगारांकडून कामेही करून घेतली जात आहेत. परंतु शहरातील १९०१ कि.मी.चे रस्ते झाडण्यासाठी १७१२ कामगारही अपुरे ठरू लागले आहेत. सिडकोत ४८३.६६ कि.मी., नाशिक पूर्व विभागात २६६.५० कि.मी., नाशिकरोड विभागात २५९.७८ कि.मी., पंचवटी विभागात ४०६.६६ कि.मी., नाशिक पश्चिम विभागात १६८.८१ कि.मी., तर सातपूर विभागात ३१५.५९ कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. कामगारांच्या समसमान वाटपानंतरही शहर स्वच्छतेतील अडचणींचा डोंगर कायम आहे. प्रामुख्याने, पंचवटी व सिडको भागातील सफाई कामाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यातच आता पावसाळ्यात सफाई कामाबरोबरच तुंबलेल्या गटारीही साफ करण्याचे काम सफाई कामगारांना दिले जाण्याचे घाटत असल्याने सफाई कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

Web Title: Cleanliness in Nashik only 1712 workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.