चाचणीसाठी पुणेगाव कालव्याची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:24 AM2018-08-18T01:24:53+5:302018-08-18T01:25:25+5:30

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी करण्यात येणा-या चाचणीसाठी कालव्याच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला आहे.

 Cleanliness of Puneanga Canal for the test | चाचणीसाठी पुणेगाव कालव्याची सफाई

चाचणीसाठी पुणेगाव कालव्याची सफाई

googlenewsNext

येवला : पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी करण्यात येणा-या चाचणीसाठी कालव्याच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला आहे.  माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी मागील आठवड्यात मतदारसंघातील काही भागाचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी विखरणी येथे जनतेशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या होत्या. याप्रसंगी पुणेगाव डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी घेण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला तर पूरपाण्याने या कालव्याची चाचणी घेण्याचे छगन भुजबळ यांनी चाचणीपूर्वी कालव्यातील अडथळे दूर करण्यात यावे अशी मागणी संबंधित विभागाकडे केली होती. या मागणीला साद घालत संबंधित विभागाने कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला तत्काळ सुरुवात केल्याची माहिती सहायक बाळासाहेब लोखंडे व पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार यांनी दिली आहे.  या कालव्यात मोठमोठे दगड व माती साठली असून, त्यामुळे पाण्याचा वेग कमी होऊ शकतो तसेच या मोठमोठ्या अडथळ्यांमधून पाणी पुढे जाऊ शकणार नाही. तरी सदर कालवा स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही या पत्रान्वये आमदार भुजबळ यांनी केली होती. कालवा प्रशासनाने या पत्राची तत्काळ दखल घेत कालवा सफाईला सुरुवात केली असून, पुणेगाव ते दरसवाडी या ६३ किमी अंतरापैकी २८ ते ६३ किमी दरम्यान कालव्यातील अडथळे तसेच सफाईचे काम सुरू करण्यात आले असून, दरसवाडी ते बाळापूर दरम्यान काम सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहितीही मोहन शेलार यांनी दिली आहे. 
गेल्या वर्षी कालव्याची चाचणी घेण्यात यावी या मागणीसाठी मोहन शेलार यांच्यासह नागरीक कालव्यावरच उपोषणाला बसले होते. उपोषणाची दखल घेत चाचणीला सुरवात झाली होती मात्र दुदैवाने पाउस थांबल्याने व काही ठिकाणी कालवा फोडण्यात आल्याने चाचणी पूर्ण होऊ शकली नव्हती. त्या वेळी आ. छगन भुजबळ तुरु ंगात नसते तर चाचणी पूर्ण झाली असती अशी त्या भागातील शेतकर्यांची भावना आहे. आता छगन भुजबळ स्वत सक्र ीय झाल्याने पुणेगाव आण िदरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले तर या वेळेस कालव्याची चाचणी पूर्ण होणारच असा आशावाद लाभक्षेत्रातील जनतेला वाटत आहे. 
नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला लाभक्षेत्रात येणाºया गावांना कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे प्रस्तावित आहे; मात्र सदर कालव्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून, पूरपाणी सोडल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊ शकतो.

Web Title:  Cleanliness of Puneanga Canal for the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी