सप्तशृंगडावर स्वच्छतेचा जागरप्लॅस्टिकबंदी : शासकीय अधिकाºयांसह ग्रामस्थांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:56 PM2017-11-09T23:56:08+5:302017-11-10T00:02:19+5:30
तीर्थक्षेत्र स्वच्छतेसाठी शासन स्तरावरून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी अमनकुमार मित्तल यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. व्यावसायिक व नागरिकांनी स्वच्छता व प्लॅस्टिकबंदीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कळवण : तीर्थक्षेत्र स्वच्छतेसाठी शासन स्तरावरून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी अमनकुमार मित्तल यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत. व्यावसायिक व नागरिकांनी स्वच्छता व प्लॅस्टिकबंदीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
गडावर प्लॅस्टिकचा वापर आढळल्यास कारवाईच्या सूचना तालुका प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन
बी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या सूचनेनुसार सप्तशृंगगड व नांदुरी येथे प्लॅस्टिकबंदी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सप्तशृंगगड ग्रामस्थांसह कळवण तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांसह शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी चार तास श्रमदान करत स्वच्छतेसाठी जनजागृती केली. सप्तंशृगगड स्वच्छ ठेवण्यासाठी श्रमदान करण्याचा निर्धार केला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील, वनविभाग, सप्तशृंगगड ग्रामपंचायत, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने गडावर स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी जनजागृती व स्वच्छता श्रमदान मोहीम हातात घेण्यात येणार आहे. बुधवारी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी अमनकुमार मित्तल, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे व कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम, वनविभागाचे अधिकारी बशीर शेख, सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच कविता व्हरगळ, सदस्य राजेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आदींसह सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवत श्रमदान केले. यावेळी स्वच्छ भारत समन्वयक सचिन मुठे, ग्रामसेवक रतिलाल जाधव, विजय वाघ, अजय दुबे, गणेश बर्डे, ग्रामस्थ संदीप बेनके, राहुल बेनके, तुषार बर्डे, राजू वाघ, नीलेश कदम, राहुल पोटे आदींसह सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.