स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:46 AM2018-08-20T01:46:50+5:302018-08-20T01:47:44+5:30
नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात १ आॅगस्टपासून स्वच्छता उपक्रमास सुरुवात झाली असून, या मोहिमेत थेट नागरिकांचा सहभाग मिळविण्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. सुमारे ५६ हजार ग्रामस्थांनी अॅपच्या माध्यमातून गावातील स्वच्छतेबाबतचे अभिप्राय नोंदविले आहेत. राज्यात नाशिक जिल्हा अभिप्राय नोंदणीत आघाडीवर आहे.

केंद्राकडून आता ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. यासाठी १ आॅगस्टपासून गावागावांमध्ये व्यापक स्वच्छता आणि जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील १३६८ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावागावांमध्ये स्वच्छता मिशन व्यापक करण्यात आले आहे. या मोहिमेत शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, ग्रामपंचायत कार्यालयांबरोबरच गावातील रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्यबाबतही सुधारणा केली जात आहे. या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी आढावा घेत आहेत. जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग कामाला लागले आहेत. गावागावातील स्वच्छतेचे काम कसे सुरू आहे यासाठी ग्रामीण भागातील जनतेचा यामध्ये थेट सहभाग असावा यासाठी ‘एसएसजी-१८’ या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थ आपल्या गावाविषयीच्या स्वच्छता कामांचे अभिप्राय नोंदवित आहेत. यामध्ये रविवारपर्यंत नाशिक जिल्ह्णातील सुमारे ५६,२५२ नागरिकांनी स्वच्छतेविषयची अभिप्राय नोंदविले आहेत. येत्या आठवडाभरात केंद्राची समिती जिल्ह्णातील स्वच्छ गावांचा दौरा करण्याची शक्यता आहे़
काय आहे अॅप :१ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन सर्वेक्षण उपक्रम राबविले जात आहे. गावागावांत स्वच्छतेविषयीचे काम कसे झाले याचा अभिप्राय या माध्यमातून नोंदवून कामातील वास्तविकता दर्शवू शकणार आहेत. अॅपमध्ये ग्रामस्थांना चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अभिप्राय म्हणून द्यायची आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.