पाणी स्त्रोतांच्या स्वच्छतेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:10 PM2018-06-14T14:10:10+5:302018-06-14T14:10:10+5:30
सप्तशृंगगड : येथील पाणी स्त्रोतांच्या पाहणीनंतर अधिकाºयांनी संबंधित कर्मचा-यांवर कडक ताशेरे ओढले असून तातडीने स्त्रोतांच्या स्वच्छतेचे आदेश दिले असून त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
सप्तशृंगगड : येथील पाणी स्त्रोतांच्या पाहणीनंतर अधिकाºयांनी संबंधित कर्मचा-यांवर कडक ताशेरे ओढले असून तातडीने स्त्रोतांच्या स्वच्छतेचे आदेश दिले असून त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. येथील पाणी दुषित असल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) २० जून रोजी तालुका संयुक्तिक बैठक व आढावा घेणार आहे. त्यापार्श्वभूमीवर कळवणचे गटविकास अधिकारी डी.एम.बहिरम ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी गडावरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली. यावेळी गडावरील सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर जवळील रस्ता ,जाळी व गेट बसविणे , गंगा जमुना कुंड खड्ड्यांमध्ये मुरूम टाकणे, शिवालय तलावाजवळील कुंड , काली कुंड , उपकेंद्राजवळील हातपंप आदी पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची पाहणी केली असता अनेक त्रुटी व अस्वच्छता आढळून आली. अधिकाºयांनी ग्रामसेवक ,सरपंच व सदस्य यांना आठ दिवसाच्या आत सर्व स्रोतांची स्वच्छता करून संरक्षक भिंत, जाळी बसविणे , स्रोताच्या परिसराजवळ स्वच्छता करून मुरूम टाकणे , नियमित पाण्याचे शुद्धीकरण करणे आदी सूचना केल्या आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी एन.पी.जे.सिद्धू , आरोग्य सेवक बी.ए.पाटील ,स्वच्छ भारत समन्वयक सचिन मुठे , ग्रामसेवक रतिलाल जाधव , सरपंच सुमनबाई सूर्यवंशी , माजी गिरीश गवळी , धनेश गायकवाड जलसुरक्षक आदी उपस्थित होते.