पिंप्री सदो येथे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:54 PM2020-10-06T22:54:16+5:302020-10-07T01:04:39+5:30

इगतपुरी : समृद्धी महामार्ग आणि नाशिक ते मुंबई महामार्ग क्र . ३ या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य ...

Clear the flyover at Pimpri Sado | पिंप्री सदो येथे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

पिंप्री सदो येथे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

googlenewsNext
ठळक मुद्देतत्वत: मान्यता : नाशिक-मुंबई अंतर होणार कमी

इगतपुरी : समृद्धी महामार्ग आणि नाशिक ते मुंबई महामार्ग क्र . ३ या दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४८ कोटी रु पयांच्या खर्चाला तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे सहा पदरी उड्डाण पुल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक ते मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.
समृद्धी महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून वेगाने सुरु आहे. नाशिक ते मुंबई महामार्ग क्र . तीन आणि समृद्धी महामार्ग या दोनही महामार्गांमध्ये अंतर असल्याने प्रवाशांना कनेक्टीव्हीटीची मोठी अडचण होत होती. दोनही महामार्ग पिंप्री सदो शिवारापासून अगदी जवळ आहेत. या दोन महामार्गांची जोडणी नसल्याने याठिकाणी सतत वाहतूक ठप्प होत असते. तसेच या ठिकाणी रोजच अनेक लहान- मोठे अपघात होत असतात. समृद्धी महामार्ग आणि नाशिक ते मुंबई महामार्ग यांना जोडणाऱ्या पिंप्री सदो शिवारात उड्डाणपुल व्हावा, अशी मागणी होत होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पिंप्री सदो शिवारात या उड्डाण पुलाला जानेवारी महिन्यात मान्यता दिलेली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उड्डाणपुलाच्या कामासाठी ४८ कोटी रु पयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. यापैकी १० कोटी रु पये नॅशनल हायवे तर उर्विरत ३८ कोटी रु पये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ देणार आहे. या उड्डाण पुलाची लांबी सुमारे ७८ मीटर असणार असून तो सहा पदरी असणार आहे.

गोंदे पर्यंत महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या प्रस्तावही लवकरच मार्गी लागणार आहे. यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास आता अडीच तासांवर येणार असून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
- हेमंत गोडसे, खासदार

 

Web Title: Clear the flyover at Pimpri Sado

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.