त्र्यंबकेश्वर बाजार समिती इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 09:56 PM2020-09-12T21:56:57+5:302020-09-13T00:07:28+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या बांधकामास परवानगी काढण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार समितीच्या ई -निविदास सहकार व पणन महासंघाने गतवर्षी बजावलेला मनाई हुकुम नुकताच उठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवाराची इमारत व गाळे पावसाळा संपल्यानंतर साकारणार असल्याची माहिती जेष्ठ संचालक उपसभापती युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, ताराबाई माळेकर व रविंद्र भोये यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या बांधकामास परवानगी काढण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार समितीच्या ई -निविदास सहकार व पणन महासंघाने गतवर्षी बजावलेला मनाई हुकुम नुकताच उठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवाराची इमारत व गाळे पावसाळा संपल्यानंतर साकारणार असल्याची माहिती जेष्ठ संचालक उपसभापती युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, ताराबाई माळेकर व रविंद्र भोये यांनी दिली. मागील वर्षी त्र्यंबकेश्वर व हरसुल येथे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवाराची इमारती सह इतर कामांची ई - निविदेस देण्यात आलेला स्थगिती आदेश सहकार व पणन महासंघा कडुन उठवण्यात आला आहे. असल्याने त्र्यंबकेश्वर येथील इमारत बांधकाम करण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. बाजार समितीला आवश्यक असणारी व कृषी उत्पन्न माल नेण्या आणण्या साठी ही जागा उपयुक्त आहे. तालुका भात उत्पादक तालुका असुन आता ब-याच शेतक-यांनी सिंचनाची व्यवस्था केल्याने भाताबरोबर नागली वरई खुरसणी भुईमुग उडीद डाळ आदी खरीप पिकांसह गहु हरबरा उस द्राक्षे जातीवंत आंब्याच्या विविध जाती याबरोबरच उत्तम जांभळे पेरु रानमेव्याला देखीझल मारूकेट उपलब्ध होणार आहे.
---------
फोटो :- त्र्यंबकेश्वर येथील बाजार समितीची प्रस्तावित इमारत(१२टीबीके३)