मुद्रांक चोरीप्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 01:28 AM2021-03-06T01:28:29+5:302021-03-06T01:29:50+5:30
दुय्यम निबंधक कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे पुणे येथील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे घेऊन जात असताना वाटेतच चोरी झाल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिक : दुय्यम निबंधक कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे पुणे येथील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे घेऊन जात असताना वाटेतच चोरी झाल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिलेख नाट्यमयरीत्या चोरीस गेलेल्या घटनेची गेल्या दोन दिवसांपासून महानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी चौकशी करीत असून मिळालेल्या माहितीनुसार, दुय्यम निबंधक कार्यालयातून आणखी तीन व्यवहारांची कागदपत्रेदेखील गहाळ झाले असल्याचे बोलले जात असल्याने शुक्रवारी पोलीस कार्यालयात येऊन धडकले.
नाशिकमधील एका व्यवहाराप्रकरणी पुण्यातील मुद्रांक महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या व्यवहाराची काही कागदपत्रे लिपिक पुणे येथे घेऊन जात होते. (पान ८ वर)