निवडणुकीचे काम आटोपून परतताना लिपिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:40 AM2019-05-01T00:40:59+5:302019-05-01T00:41:29+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्रजी शाळा खोली क्रमांक ६ वरील मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून सोमवारी (दि.२९) सायंकाळी घराच्या दिशेने निघालेले कृष्णा भरत सोनवणे (४६, रा. हिरावाडी) हे जुने सीबीएस बसस्थानकाच्या आवारात चक्कर येऊन कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 The clerk died when he returned from office | निवडणुकीचे काम आटोपून परतताना लिपिकाचा मृत्यू

निवडणुकीचे काम आटोपून परतताना लिपिकाचा मृत्यू

Next

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील नूतन इंग्रजी शाळा खोली क्रमांक ६ वरील मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून सोमवारी (दि.२९) सायंकाळी घराच्या दिशेने निघालेले कृष्णा भरत सोनवणे (४६, रा. हिरावाडी) हे जुने सीबीएस बसस्थानकाच्या आवारात चक्कर येऊन कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरासह जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेचे कामकाज आटोपून घरी जात असलेले मविप्र संस्थेचे कर्मचारी सोनवणे त्र्यंबकेश्वर-नाशिक बसमधून उतरताच त्यांना चक्कर आली व ते बसस्थानकाच्या आवारात कोसळले. त्यांना नागरिकांनी उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी त्यांचे बंधू सखाराम सोनवणे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे पुढील कार्यवाहीसाठी विनंती केली आहे. सोनवणे हे देवळाली येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.३०) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगे, मुली, असा परिवार आहे.

Web Title:  The clerk died when he returned from office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.