येस बॅँकेसमोर ग्राहकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:11 PM2020-03-09T12:11:21+5:302020-03-09T12:11:30+5:30
लासलगाव : गेल्या तीन वर्षापासून लासलगाव शहरामध्ये येस बँकेची शाखा कार्यरत असून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, व्यापारी वर्गांचे बचत खाते आणि ठेवी या शाखेमध्ये आहे.
लासलगाव : गेल्या तीन वर्षापासून लासलगाव शहरामध्ये येस बँकेची शाखा कार्यरत असून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, व्यापारी वर्गांचे बचत खाते आणि ठेवी या शाखेमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेने गुरूवारी येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार ग्राहकांना बँकेतून ५० हजार रूपयांची रक्कम काढता येणार असल्याचे पसरताच येथील येस बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा लागल्या. येस बँक शाखेत सर्व खातेधारकांना बँकेकडून ५० हजार रु पयापर्यंत रक्कम दिली जात आहे. सातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत रिझर्व बँकेने खाजगी क्षेत्रातील येच बँकेवर निर्बंध लागू केल्याने बँकेच्या खातेधारकांना महिन्याकाठी केवळ ५० हजार रु पये काढता येणार आहे. लासलगाव येथील शाखेमध्ये सकाळी नऊ वाजेपासून ग्राहकांनी बँकांसह एटीएम बाहेर गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान निर्बंधांमुळे ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. येस बँकेच्या शाखेमध्ये साधारणत: दीड कोटी रु पयांचे ठेवी शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाच्या अडकल्याचा अंदाज आहे.