हवामान बदलाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 03:03 PM2019-12-26T15:03:24+5:302019-12-26T15:04:05+5:30
पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे.
पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे. मन्यांना तडे जात असल्याने शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसाचा धसका घेतला असून धाकधूक वाढली असून खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जातो की काय ? अशी भीती सतावत आहे.
दुष्काळी येवला तालुक्याला यावर्षी ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागला आहे. खरीप हंगाम चांगला आला, आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलाबाळांची लग्ने व्यवस्थित पार पाडू अशी स्वप्ने मनाशी बाळगणाºया शेतकºयांचा परतीच्या अवकाळी पावसाने घात केला , आण िशेतकर्यांची स्वप्ने स्वप्न च राहिले ऐन पिके कापणी च्या सुमारास या अवकाळी पावसाने थैमान घालून होत्या चे नव्हते केले .यात खरीप हंगामातील सोयाबीन,मका,बाजरी,पोळ कांदा, कांदा रोपे शेतातच सडून गेल्या शेतकºयांचे नुकसान झाले . या दुख: तुन सावरून शेतकरी वर्गाने उधार उसनवारी करीत रब्बी हंगामातील गहू हरभरा, रांगडा कांदा, कांदा रोपे ,उन्हाळ कांदा या पिकांची पिकांची शेतात पेरणी केली ,पिकांची वाढ होत असतानाच पुन्हा या पिकांना ढगाळ हवामान,पहाटेचे दाट धुके व दविबंदू यांची नजर लागली आहे .त्यामुळे या पिकांवर मर,करपा,मावा अळी या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, शेतकर्यांचे नकदी पीक असलेला कांदा रोगाचा सर्वाधिक बळी पडला असून त्याची संपूर्णपणे वाढ खुंटली आहे.तर कांदारोपे धुके दवाचे बळी ठरले .
---------------------------
भुरी,डावणी, मर रोगांचे अतिक्र मण
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसला आहे, निम्यापेक्षा जास्त बागांना या वर्षी फळधारणा न झाल्याने शेतकर्यांचे लाखो रु पयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, आॅक्टोबर महिन्यानंतर ज्या काही थोड्या फार द्राक्ष बागा सुस्थितीत होत्या. त्या बागांवरही या वातावरणाने भुरी,डावणी, मर या रोगांनी अतिक्र मण केले असे असूनही शेतकरी वर्गाने विविध प्रकारचे महागडी औषधे व बुरशीनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या तीनचार दिवसांपासून वातावरणातील बदलाने तसेच दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे द्राक्ष बागांवर पुन्हा संकट कोसळले आहे. तसेच द्राक्ष मणी तडकू लागल्याने आहे.
---------------------------------
महागड्या औषधांची फवारणी
हवामान खात्यानेही पावसाची तसेच गारिपटीचा अंदाज वर्तिवला असल्याने शेतकरी वर्गाची धाकधूक वाढली असून त्याच्या डोक्यात चिंतेचे ढग घोंगावत आहे.वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील कांदा, कांदारोप,गहू , हरभरा, द्राक्ष बागा, डाळिंब बागा यांच्यावर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहे .त्यामुळे उत्पादन खर्चात चार ते पाच पटीने वाढ झाली आहे. असे असूनही सध्याच्या या वातावरणामुळे पिके वाया जाणार असल्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे.
-----------------------------------------
सततच्या वातावरणातील बदलामुळे पिके धोक्यात आली आहे ,पिकांवर रोगांचा प्रदूर्भाव वाढला आहे .औषध फवारणी करून रोगांवर नियंत्रण येण्याच्या वेळेस पुन्हा हवामानातील बदलाने पहिले पाढे पंचावन्न अशी गत झाली आहे. दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा शिडकावा होत असल्याने धास्ती वाटत आहे
जनार्दन भवर, द्राक्ष उत्पादक, , ठाणगाव