नाशकात शहरासह उपनगराच्याही सीमा बंद शहरासह उपनगरांच्याही सीमा बंद    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 02:46 PM2020-04-04T14:46:11+5:302020-04-04T14:50:12+5:30

नाशिक शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी शहरासह उपनगरांच्या सीमाही शुक्रवारी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून शहरातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सिडको, सातपूर, इंदिरानगर, वडळा, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, नांदूरनाका, आडगाव, पंचवटी, दिंडोरीरोड, गंगापूररोड, आनंदवल्ली , शिवाजीनगर, श्रमीकनगर परसिरात प्रवेशाचे व बाहेर पडण्याच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरीकेट्स लावून उपनगरांच्याही सर्व सीमा बंद केल्या आहेत. 

Close suburban border with city in Nashik | नाशकात शहरासह उपनगराच्याही सीमा बंद शहरासह उपनगरांच्याही सीमा बंद    

नाशकात शहरासह उपनगराच्याही सीमा बंद शहरासह उपनगरांच्याही सीमा बंद    

Next
ठळक मुद्देसंचारबंदीची अधिक सक्तीने अंमलबजावणीशहरातील उपनरांच्या सीमाही केल्या बंद

नाशिक : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरासह राज्यात आणि नाशिक जिल्हा व शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी शहरासह उपनगरांच्या सीमाही शुक्रवारी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून शहरातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सिडको, सातपूर, इंदिरानगर, वडळा, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, नांदूरनाका, आडगाव, पंचवटी, दिंडोरीरोड, गंगापूररोड, आनंदवल्ली , शिवाजीनगर, श्रमीकनगर परसिरात प्रवेशाचे व बाहेर पडण्याच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरीकेट्स लावून उपनगरांच्याही सर्व सीमा बंद केल्या आहेत. 
नाशिक शहरात अद्याप एकही रु ग्ण आढळून आलेला नसला तरी ग्रामीण भागात एक रु ग्ण आढळून आला असल्याने प्रशासनाने अधिक सतर्क होत संचारबंदी, साथरोग प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना आजार अधिक पसरू नये, यासाठी नागरिकांनी आपापल्या घरांमधून बाहेर पडणे टाळावे, विनाकारण जर कोणी घराबाहेर आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देताना पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनेही तीन महिन्यासाठी जप्त करण्याची कारवाई केली आहे. शहरात कोणीही परदेश दौरा करून आले असेल तर त्याची माहिती तत्काळ  शहर पोलीस नियंत्रण कक्ष किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन आता कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी शहरातील सिडको- उंटवाडी, अंबड- एक्लो पॉईंट-सातपूर-आयटीआय सिग्नल व सातपूर पोलीस ठाणे, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक-वडाळा -पाथर्डीरोड, नांदूरनाका-आडगाव भागात विविध ठिकाणी उपनगरांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या भागात दूध, भाजीपाला, औषधे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, नाकाबंदीवर तैनात पोलीसांकडून अशा सेवा देणाऱ्यांना सहकार्य करून जवळचा पर्यायी मार्ग दाखवून मदत केली जात आहे. 
 

वाहनांची कसून तपासणी 
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी सवलत दिली जात असल्याने अनेक नागरिक औषधांची कारणे सांगून शहरातील रस्त्यांवर वाहने घेऊन येत असल्याने शहर पोलीसांकडून मुंबई नाका, द्वारका परिसरात वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरही पोलीसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होत आहे. 

Web Title: Close suburban border with city in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.